Male Contraception | पुरुषांसाठी ‘कंडोम’ला नवीन पर्याय, चुंबकाने स्पर्म होतील ‘कंट्रोल’; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Male Contraception | नको असलेली गर्भधारणा रोखण्यासाठी महिलांकडे अनेक पर्याय आहेत परंतु पुरुष केवळ कंडोम किंवा नसबंदीचाच आधार घेऊ शकतात. मात्र, अमेरिकेच्या नॅनो लेटर्स मॅगझीनमध्ये चीनच्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की पुरुषांसाठी रिव्हर्सिबल चुंबकीय बायोडिग्रेडेबल नॅनोमटेरियल्स (Male Contraception) विकसित केले आहे. हे किमान 30 दिवसापर्यंत गर्भनिरोधकाचे काम करते. उंदरांवर याचा प्रयोग यशस्वी झाला आहे.

शास्त्रज्ञांनुसार, उच्च तापमानावर स्पर्मचे प्रॉडक्शन होऊ शकत नाही यासाठी नर उंदरांच्या बाहेरील स्किनवर प्रयोग करण्यात आला. यापूर्वीचे सर्व शोध जास्त तापमानावर नॅनोमेटेरियल्सवर करण्यात आले होते ज्यांना बर्थ कंट्रोलच्या रूपात इंजेक्शनप्रमाणे उंदरांना दिले गेले होते. ही प्रक्रिया खुप वेदनादायक होती आणि यामुळे स्कीनचे सुद्धा खुप नुकसान झाले. ते नॅनोमेटेरियल्स बायोडिग्रेडेबल सुद्धा नव्हते. म्हणजे ते नैसर्गिक प्रकारे नष्ट होणारे नव्हते.

नवीन संशोधनात संशोधकांनी एक चांगल्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. संशोधकांनी बायोडिग्रेडेबल आयर्न ऑक्साईड नॅनोपार्टिकल्सच्या दोन रूपांचे परीक्षण केले. यांना चुंकबासोबत लावून गरम केले जाऊ शकते. एका नॅनोपार्टिकलवर पॉलीइथायलीन ग्लायकॉल (PEG) आणि दूसर्‍यावर सायट्रिक अ‍ॅसिडचा लेप लावला गेला होता.

शास्त्रज्ञांना आढळले की, पॉलीइथायलीन ग्लायकॉल नॅनो पार्टीकल उच्च तापमानावर गरम केले जाऊ शकते, परंतु सायट्रिक अ‍ॅसिडच्या तुलनेत त्याची सहजपणे तोडमोड करता येऊ शकत नाही. मनुष्यावर कोणत्याही प्रकारच्या ट्रायलपूर्वी प्राण्यांवर याची ट्रायल करणे आवश्यक असते.

प्रयोगासाठी शास्त्रज्ञांनी दोन दिवसापर्यंत उंदारांना सायट्रिक अ‍ॅसिड-लेप केलेल्या नॅनोपार्टिकलचे इंजेक्शन अनेकदा दिले.
यानंतर चुंबकासोबत याचा प्रयोग केला.
टेस्ट केल्यानंतर सर्व नॅनोपार्टिकल्सवर 15 मिनिटासाठी पर्यायी चुंबक लावण्यात आले.
यानंतर संशोधकांनी यास 104 डिग्री फॅरनहाईटच्या तापमानावर गरम केले.

संशोधकांना आढळले की या प्रयोगात उंदरांचे शुक्राणुजनन जवळपास 30 दिवस कमी झाले.
यानंतर हळुहळु त्यांच्या स्पर्म प्रॉडक्शनमध्ये सुधारणा होऊ लागली.
या प्रयोगाच्या सातव्या दिवसापासून मादी उंदीरांची प्रेग्नंसी थांबली.
संशोधकांना आढळले की, साठाव्या दिवसापासून या मादी उंदरांची प्रेग्नंसी क्षमता पुन्हा परत येऊ लागली.

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, हे नॅनोपार्टिकल्स पेशींसाठी नुकसानकारक नाही आणि ते सहजपणे शरीरातून बाहेर काढता येऊ शकतात.
संशोधकांना या प्रयोगातून खुप आशा आहे. या प्रयोगातून पुरुषांसाठी एक चांगला पर्याय मिळू शकतो.

Web Title :- male contraception researchers near effective and safe solution

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | पुण्यात क्रीडांगणावर श्रीरामांचे शिल्प उभारण्याच्या निर्णयाला राष्ट्रवादीचा तीव्र विरोध, शहराध्यक्ष म्हणाले – ‘क्रीडांगणात राजकीय, धार्मिक खेळ कशाला?’

Mumbai Police Dance | ‘आया है राजा…’ या गाण्याचा ठेका धरत मुंबईतील पोलिसाचा डान्सचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल

Maharashtra Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी CET परीक्षा होणार नाही