Mumbai Police Dance | ‘आया है राजा…’ या गाण्याचा ठेका धरत मुंबईतील पोलिसाचा डान्सचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Mumbai Police Dance । सोशल मीडियावर व्हायरल होणारे अनेक व्हिडीओ नेटकऱ्यांसोबतच या वर्तुळात नसणाऱ्यांसाठीही कुतूहलाचा विषय ठरत असतात. निमित्त ठरतात ती विविध माध्यमं. सध्या अशाच वेगवेगळ्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचलेल्या एका मुंबई पोलीस कर्मचाऱ्याची (Mumbai Police) चर्चा सर्वत्र सुरु आहे. आया है राजा, लोगो रे लोगो या गाण्याचा ठेका धरत तरुणाईला आणि प्रशिक्षित डान्सर्सना (Dance) देखील लाजवेल असा भन्नाट डान्स हे पोलीस करत आहेत.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

मुंबई पोलिस (Mumbai Police) दलातील पोलीस कर्मचारी अमोल कांबळे (Police Constable Amol Kamble) यांचा हा डान्स व्हिडीओ आहे. ‘आया है राजा’ लोगो रे लोगो’ या गाण्यावर त्यांनी ठेका पकडला आहे. त्यांचा दबंग स्टाईलने केलेला डान्स सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पोलीस कर्मचारी अमोल कांबळे यांच्या गाण्याचा डान्स सोशल मीडियावर चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहे. अमोल कांबळे यांच्या या व्हिडिओला हजारो शेअर्स आणि लाखो लाईक्स मिळत आहेत.

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

अमोल कांबळे (Police Constable Amol Kamble) यांचा डान्स (Dance) भल्याल्या डान्स करणाऱ्यांचा आणि कलाकारांचा डान्सही अमोल कांबळे यांच्या डान्सपुढे फिका ठरत आहे. त्यांचा एकंदर अंदाज, चेहऱ्यावरील हावभाव आणि गाण्यातील ठेक्यावर थिरकणारे त्यांचे पाय पाहिले की नकळतच व्हिडीओ पाहणाऱ्यांच्या देखील चेहऱ्यावर स्मित येत आहे. यामुळे ते प्रसिद्ध होत आहेत. सोशल मीडियावर आणि विशेषतः इंस्टाग्रामवर आपल्या या डान्समुळे ते व्हिडीओ स्टार बनले आहेत. ते आपले डान्स व्हिडीओज टिकटॉकवर तयार करायचे. पुढे आपल्याकडे टिकटॉक बॅन झाल्यानंतर त्यांनी इन्टाग्राम (Instagram) रिल्सच्या माध्यमातून आपले हे डान्स व्हिडिओज शेअर करायला सुरुवात केली आहे.

 

खरंतर अगदी सुरुवातीला अमोल कांबळे हे आपले डान्स व्हिडीओज टिकटॉकवर (Dance videos on TickTock) बनवायचे. पुढे आपल्याकडे टिकटॉक बॅन झाल्यानंतर त्यांनी इन्टाग्राम रिल्सच्या माध्यमातून आपले हे डान्स व्हिडिओज शेअर करायला सुरुवात केली. दरम्यान एक वृत्ताला मुलखात देताना पोलीस कर्मचारी अमोल कांबळे सांगतात की, ‘ड्युटी सुटायची तेव्हा किंवा सुट्टीच्या दिवशी मी व्हिडीओ पोस्ट करत होतो. पण, नंतर ते बंद झालं. नंतर मला एका मित्राने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करायला सांगितलं. तेव्हा इन्स्टाग्रामवर जुनेच व्हिडीओ टाकण्यास सुरुवात केली. पुढे अशी वजनदार शरीरयष्टी असणारा माणूसही कशा प्रकारे अनोख्या अंदाजात या कलेचा आनंद घेतो याबाबचं नेटकऱ्यांचं कुतूहल वाढलं आणि व्हिडीओ गाजत गेले’.

 

Web Tital : Mumbai Police Dance | mumbai police amazing dance video goes viral

Maharashtra Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी CET परीक्षा होणार नाही

Sad News | शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानचे कार्यकारी व्यवस्थापक शिवशंकरभाऊंच्या निधनाने विवेकानंद केंद्राने आत्मज गमावला : भानुदासजी

Pune News | निर्बंध डावलून दुपारी 4 नंतरही लक्ष्मी रस्त्यावरील दुकाने सुरू? दुकानदार- पोलिसांत शाब्दिक बाचाबाची

IDBI Bank Recruitment 2021 | IDBI बँकेत 920 जागांसाठी बंपर भरती