अभिनेत्री मल्‍लिका शेरावतचा मोठा ‘गौप्यस्फोट’ ; म्हणाली, ‘तसं न केल्यामुळे गमावले अनेक चित्रपट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मल्लिका शेरावत तब्बल १७ वर्षानंतर तुषार कपूर सोबत चित्रपटामध्ये दिसून येणार आहे. एकता कपूरची वेब सिरीज सबकी फटेगी पासून तुषार आणि मल्लिका डिजिटल मध्ये डेब्यू करणार आहे. मल्लिकाचा ड‍िज‍िटलमधील डेब्यू तिच्यासाठी खूप खास आहे. पण खूप दिवसांपासून ती चित्रपटापासून का दूर आहे. या गोष्टीबद्दल अभिनेत्रीने चकित करणारी गुपिते खोलली. एका मुलाखतीत बोलतांना मल्लिकाने सांगितले की, मला अनेक चित्रपटांमध्ये काही रोल न केल्यामुळे काढून टाकले होते, कारण मी हिरोला डेट करत नव्हती. तिने सांगितले की, इंडस्ट्री मध्ये जास्ततर हिरो आणि डायरेक्टर-प्रोड्यूसर आपल्या गर्लफ्रेंडसोबत काम करू इच्छिता. या कारणांमुळे तिला अनेक चित्रपटातुन बाहेर काढले.

मल्लिकाने मीटू कॅम्पेन चा वेळी बोलताना सांगितले की, मला सेक्स साठी कधी कोणी डिमांड नाही केली. याचे कारण म्हणजे मी एक बोल्ड पेर्सनालिटी आहे. मला असे विचारण्याची कोणी हिम्मत देखील करू शकत नाही. मीटू कॅम्पेन खूप पॉज‍िट‍िव स्टेप आहे. यामुळे कामाचे वातावरण या आधी पेक्षा खूप सुरक्षित झाले आहे. यासोबतच प्रत्येकावर एक जबाबदारी देखील आली आहे.

मल्लिकाचा हा चित्रपट एक हॉरर कॉमेडी सीरीज असेल. ज्यामध्ये मल्लिका आणि तुषार च्या व्यतिरिक्त कॉमेडियन कृष्णा अभिषेक, कीकू शारदा, शेफाली जरीवाला, साक्षी प्रधान, श्वेता गुलाटी, अनिल चरणजीत आणि संजय मिश्रा असतील. मल्लिका या वेब सीरीज मध्ये हसीना नावाच्या मुलीची भूमिका करणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त   

‘या’ घरगुती उपायांनी काळ्या ओठांना बनवा मऊ आणि गुलाबी

जाणून घ्या – मूत्रपिंड विकाराची लक्षणे

पाठदुखी का होते ? जाणून घ्या कारणे, करा हे उपाय

मनशांतीसाठी सहज करता येतील ‘हे’ सोपे आणि घरगुती उपाय

सिनेजगत

‘वजन’ जास्त असल्याने ‘या’ अभिनेत्रीचं झालं मोठ नुकसान

Video : हरियाणवी नंतर आता पंजाबी गाण्यांवरही ‘डान्सर’ सपना चौधरीचे ‘ठुमके’