महिलेची फसवणूक करणारा पोलिसांच्या जाळ्यात

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी आलेल्या महिलेला मदत करण्याच्या बहाण्याने महिलेचे एटीएम कार्डची आदलाबदल केली. महिलेच्या कार्डवरुन दागिने खरेदी करुन फसवणूक करणा-या सराईत गुन्हेगारास अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पिंपरी चिंचवड सायबर सेल आणि आळंदी पोलिसांनी संयुक्तपणे केली.

श्रवण सतिश मिनजगी (रा. भीमा कोरेगाव, मुळ रा. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सलीमाबी कादर इनामदार (वय-६० रा. च-होली) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सलीमाबी या २३ एप्रिल रोजी आळंदी मरकळ रोडवरील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी आरोपीने मी मदत करतो असे सांगून त्यांचे एटीएम कार्ड घेतले. तसेच एटीएमचा पिन नंबर विचारून पैसे ट्रान्सफर करण्याचे नाटक केले. काही वेळाने त्याने एटीएम मशीन नादूरुस्त असल्याचे सांगून त्यांना दुसरे एटीएमकार्ड दिले. यानंतर त्याने कार्डद्वारे ४० हजार रुपये काढले. तसेच ३९ हजार ५१८ रुपयांचे दागिने खरेदी करुन फिर्यादी सलीमाबी यांची ७८ हजार ५१८ रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या गुन्ह्याचा तपास सायबर सेल आणि आळंदी पोलीस करीत होते. तांत्रीक तपास करून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

ही कारवाई पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, आळंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर.व्ही. चौधर, पोलीस निरीक्षक गुन्हे पी.व्ही.जाधव, सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक निलेश बोडखे, महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती लामखडे, पोलीस नाईक कोंकेरी, अतुल लोखंडे, भास्कर भारती, मनोज राठोड, नितेश बिच्चेवार, प्रदिप गायकवाड, पोपट हुलगे, नाजुका हुलवळे, आशा सानप यांनी केली.

You might also like