पत्नीच्या अफेअरला कंटाळून पतीची गोळी झाडून आत्महत्या, व्हिडीओ शेअर करत जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  उत्तरप्रदेशच्या कासगंजमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाने आत्महत्याकरण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे व्हिडीओच्या माध्यातून पत्नी आणि तिच्या प्रियकरावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला त्यानंतर त्याने स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली आहे. नबी हसन (वय ३५) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, हसन यांच्या पत्नीचे घरा शेजारीच राहणाऱ्या तौफीकसोबत अनैतिक संबंध सुरु होते. दरम्यान हसनने आपल्या पत्नीला दिल्ली, गाझियाबाद येथे नेहले त्यावेळी तौफिकही तेथे पाेहोचला होता. तौफिकसह पत्नीलाही वारंवार सांगूनही ते दोघेही थांबवले नाही. दोघेही एकमेकांना भेटतच राहिले. या त्रासाला कंटाळून नबीने पटियालीला जाण्याच्या निर्णय घेतला. त्यानुसार तो व त्याची पत्नी पटियालीमध्ये राहूल लागले. पण तरीही भेटाभेटीचे प्रकार थांबले नाही. शेवटी नबीने तौफिकच्या घरच्यांना यासंदर्भात सांगितले. मात्र, तौफिकच्या भावाने आणि वडीलांनी नबीलाच घरात घुसून मारहाण केली.यामध्ये आरोपींबरोबर नबीची पत्नीही सामील झाली होती. या सर्वांनी मारून टाकण्याची धमकी नबीला दिली होती. यामुळे नबीला मानसिक धक्का बसला होता. नबीने एक व्हिडीओ तयार केला. त्यामध्ये त्याने आपल्या पत्नीवर आणि तिच्या प्रियकरावर कारवाई करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली. तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर नबीने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला.

याप्रकरणी अपर पोलीस अधिक्षक आदित्य प्रकाश वर्मा म्हणाले की, सकाळी ७ वाजता नबीने स्वत:वर गोळी झाडून घेतली. शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला आहे. नबीने शेअर केलेला व्हिडीओ मिळाला असून यामध्ये त्यांनी कौटुंबिक कारणामुळे आत्महत्या केल्याचं सांगितलं आहे. या व्हिडीओची खातरजाम करून पुढील कार्यवाही केली जाईल असे वर्मा यांनी सांगितले.