बोंबाबोंब ! बायकोच्या क्रेडीट कार्डवरून त्यानं भरला गर्लफ्रेन्डचा ट्रॅफिक फाइन, असा झाला पर्दाफाश

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अनेकजण आपल्या पत्नीपासून अनेक गोष्टी लपवत असतात. त्यात जर लग्नानंतरही गर्लफ्रेंड असेल तर अशा व्यक्ती पत्नीला हि गोष्ट कळू नये म्हणून आटोकाट प्रयत्न करत असतात. मात्र केव्ह्ना ना केव्हा ते समजतेच. अशीच एक पण विचित्र घटना दुबईमध्ये समोर आली आहे.

एका महिलेने तिचं क्रेडीट कार्ड हॅक झाल्याची तक्रार पोलिसात दिली. पण मुळात तिचं कार्ड हॅक झालंच नव्हतं. तक्रार दिल्यावर चौकशीनंतर समोर आलं की, तिचा पती तिचं क्रेडीट कार्ड आपल्या गर्लफ्रेन्डचा ट्रॅफिकचा दंड भरण्यासाठी वापरतोय. तेव्हा पतीच्या गर्लफ्रेन्डचा भांडाफोड झाली.

दुबई पोलीसमधील सायबर क्राइम डिपार्टमेंटचे डेप्युटी डायरेक्टर कॅप्टन अब्दुल्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना एका महिलेची तक्रार मिळाली होती. तक्रारीत या महिलेने सांगितले होते की, तिचं क्रेडीट कार्ड गायब झालंय आणि ट्रॅफिकचा दंड भरण्यासाठी तिच्या कार्डचा वापर झाला आहे. महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांना चौकशी केली. पोलिसांनी चौकशी केल्यावर अशा गोष्टी समोर आल्या की, सर्वांनाच धक्का बसला. ज्या महिलेने तक्रार दाखल केली होती तिच्या पतीनेच त्याच्या गर्लफ्रेन्डसाठी या क्रेडीट कार्डचा वापर केला होता.

तक्रार करणाऱ्या महिलेला हे माहीतच नव्हतं की, तिच्या पतीची एक गर्लफ्रेन्ड आहे. इतकेच नाही तर या व्यक्तीच्या गर्लफ्रेन्डलाही हे माहीत नव्हतं की, तो विवाहित आहे.
जेव्हा क्रेडीट कार्ड देवाण-घेवाणीची सूचना महिलेला मिळाली तेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला त्यानंतर महिलेने दुबई पोलिसात तक्रार देऊन कार्ड ब्लॉक केलं.