Manchar police station । अवसरी बुद्रुक येथील खासगी सावकाराविरुध्द गुन्हा दाखल

पुणे / पारगाव (Pune / Pargaon) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online)– Manchar police station । आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक (Avsari Budruk) येथील एका बेकायदेशीर खासगी सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगाधर दगडू गोरे (रा.अवसरी बुद्रुक, ता. आंबेगाव, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. गंगाधर यांच्याकडे अधिकृत सावकारी परवाना नसताना अवैधरित्या खासगी सावकारी व्यवसाय करून गरजू व्यक्तींना पैसे देऊन व्याज स्वरूपात पैसे घेऊन गरजू व्यक्तींची आर्थिक पिळवणूक केल्या प्रकरणी त्याच्याविरुद्ध मंचर पोलीस ठाण्यात (Manchar police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात फिर्याद सहकारी संस्था मंचरच्या सहाय्यक निबंधक मनीषा हरिभाऊ नाईकनवरे यांनी दिलीय.

याबाबत अधिक माहितीनुसार, सहाय्यक निबंधक सरकारी संस्था मंचर येथील कार्यालयात (22 जून) रोजी सुरेश जयवंत मांदळे (रा.अवसरी बुद्रुक) आणि अशोक ह्रदयनारायण तिवारी (रा. नारायणगाव) या दोघांनी गंगाधर गोरे (Gangadhar Gore) याच्याविरुद्ध अवैध सावकारी करत असल्याची तक्रार दिली होती. याबाबत प्राथमिक चौकशी करून महाराष्ट्र सरकारी अधिनियमन 2014 च्या तरतुदीनुसार मंचर पोलिसांशी पत्र व्यवहार करून यातील गंगाधर गोरेच्या (Gangadhar Gore) निवासस्थानी पोलिस बंदोबस्त घेऊन सावकाराचे निबंधक आणि सहाय्यक निबंधक अधिकारी यांच्यासह पथकांनी छापा टाकला. घराची झडती घेतली असता गंगाधर गोरे यांच्याकडे कोरे सहीचे चेक/ कोऱ्या सह्याचे स्टॅम्प पेपर ,रजिस्टर ,सहीचे रेव्हीन्यू स्टॅम्प, आदि संशयास्पद कागदपत्रे सापडली.

दरम्यान, यावरून गंगाधर गोरे (Gangadhar Gore) हा अवैध सावकारी व्यवसाय करून तक्रार
अर्जदार यांच्याकडून व्याजाची आकारणी करून गरजू व्यक्तींची आर्थिक पिळवणूक करत
असल्याची खात्री झाल्याने गंगाधर गोरेच्या विरोधात मंचर पोलिस स्टेशनमध्ये (Manchar police
station) गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास मंचर पोलिस ठाण्याचे पीआय सुधाकर कोरे
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार डावखर करत आहे. तर ही कारवाई निबंधक आणि
सहाय्यक निबंधक अधिकारी पी. एस. रोकडे, सहाय्यक सरकारी अधिकारी एस. जी. लादे, एस.
एस. चौधरी, आणि दोन पंच यांनी केली आहे.

हे देखील वाचा

Amul Milk झाले महाग, ग्राहकांना उद्यापासून द्यावी लागेल वाढलेली किंमत, जाणून घ्या


ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : manchar police station | filed a crime against a private lender of avsari budruk

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update