Mandakini Khadse | जळगाव दूध संघातील अपहार प्रकरणात खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यावर गुन्हा दाखल

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – जळगाव जिल्हा दूध संघात (Jalgaon Jilha Sahakari Dudh Utpadak Sangh Maryadit) सुमारे सव्वा कोटीचा अपहार झाल्याचे उघड झाले होते. पोलिसांनी या प्रकरणात विलंबाने गुन्हा दाखल केला आहे. एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) या जळगाव दूध संघाच्या अध्यक्षा आहेत. त्यामुळे मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) यांच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

भाजप आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांनी जळगाव दूध संघात सुमारे दोन ते अडीच कोटी रुपये किंमतीचे 14 टन लोणी आणि 9 टन दूध पावडरचा अपहार झाल्याची तक्रार पोलिसांत दिली होती.
या प्रकरणात संघाच्या अध्यक्षा, संचालक आणि कार्यकारी मंडळीचा हात असल्याचे देखील त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
या प्रकरात संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये (Manoj Limaye) यांनी पोलिसांना जबाब दिला आहे.
त्यात त्यांनी संघात 14 टन लोणी आणि 9 टन दूध पावडरचा अपहार झाल्याची कबुली दिली आहे.
परंतु पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर हा अपहार नसून चोरी असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
त्यामुळे पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसच या तक्रारीत फिर्यादी आहेत.

दरम्यानच्या काळात मनोज लिमये यांनी ज्या कर्मचाऱ्यांना निलंबित केले त्यांच्या निलंबन पत्रात हा अपहार असल्याचे नमूद केले आहे.
हाच मुद्दा लक्षात घेऊन पोलिसांनी दूध संघाची व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दूध संघातील जबाबदार आणि संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे.
त्यात एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse)  यांचा देखील समावेश आहे.

 

Web Title :- Mandakini Khadse | eknath khadses wifes mandakini problems will increase a case has been registered in the case of embezzlement of butter

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kishori Pednekar | ‘हे भाजपला उशिरा आलेले शहाणपण’, पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेतल्यावर किशोरी पेडणेकर यांचा हल्लाबोल    

Chitra Wagh | चित्रा वाघ यांचे खासदार सुळेंना प्रत्युत्तर, म्हणाल्या – ‘भाजपाची काळजी सोडा सुप्रियाताई…, A for अमेठी, B for…’

Andheri By-Election | राज ठाकरेंच्या पत्रानंतर भाजपाची माघार, मनसेने प्रतिक्रिया देताना म्हटले – ‘जर हा निर्णय…’