Mandhardevi Kalubai Temple | मोठी बातमी : मांढरदेवी गडावरील काळुबाई मंदिराचा गाभारा उद्यापासून 8 दिवस दर्शनासाठी बंद

सातारा : Mandhardevi Kalubai Temple | मांढरदेव देवस्थानने माहिती दिली आहे की, राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेव येथील काळेश्वरी देवीच्या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे मूळ मूर्तीचे दर्शन उद्यापासून (गुरुवार) २८ सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. (Mandhardevi Kalubai Temple)

अशी आहे पर्यायी व्यवस्था

मात्र, भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मुख्य गाभाऱ्याच्या दुरुस्तीच्या काळात भाविकांसाठी येथील सभामंडपात उत्सवमूर्ती ठेवण्यात येईल. यामुळे भाविकांना आपले कुलधर्म कुलाचार करण्यात अडचण येणार नाही. त्यामुळे भाविकांची निराशा होणार नाही. या काळात भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे. (Mandhardevi Kalubai Temple)

भौगोलिकदृष्टया काळूबाईचे स्थान
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात मांढरदेव येथे श्री काळेश्वरी उर्फ काळूबाईचे देवस्थान आहे.
हे स्थान समुद्र सपाटीपासून ५०० फूट उंचीवर आहे. वनराईत विराजमान काळूबाईचे स्थान भौगोलिकदृष्टया शंभू-महादेवाच्या डोंगररांगेत पुणे व सातारा या दोन जिल्ह्यांच्या तसेच वाई – भोर- खंडाळा या तीन तालुक्यांच्या सरहद्दीवर आहे.

अशी आहे मांढरदेवीची अख्यायिका
द्वापार युगाच्या अखेरीस दैत्यराजा रत्नासूराचा सेनापती देवीलाख्यासूराच्या त्रासापासून ऋषीमुनींच्या सुटकेसाठी
मंडाबाईनेच आदिमाया पार्वती देवीला हाक मारली होती. म्हणूनच देवी तिच्या हाकेला धावून आली.
या युद्धात काळभैरवनाथाने देवीला साहाय्य केले. पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री दैत्याला ठार केले.
मांढव्यऋषींच्या नावावरून देवीचे नाव मांढरदेवी व गावाचे नाव मांढरदेव असे पडले, अशी अख्यायिका आहे.

शाकांबरी पौर्णिमेला देवीची यात्रा
शाकांबरी पौर्णिमेच्या दिवशी मांढरदेवच्या यात्रेला सुरुवात होते. नवसाला पावणारी देवी अशी काळुबाईची ख्याती आहे. शाकांबरी पौर्णिमेला सुरु होणारी ही यात्रा १० दिवसांची असते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Womens Reservation Bill | महिला आरक्षण विधेयक आणण्यासाठी 9 वर्ष का लागली? भाजपला खोचक टोला लगावताना काँग्रेसने म्हटले…