Mango Butter Skin Care Tips : उन्हाळ्यात करा मँगो बटरचा वापर, सनबर्न आणि टॅनिंगपासून मिळेल दिलासा

पोलीसनामा ऑनलाईन टीम : उन्हाळ्यात टॅनिंग, सनबर्न आणि प्रदूषणामुळे स्किन खुप खराब होते. या हंगामात मार्केटमध्ये आंबे मोठ्याप्रमाणात येतात. अशावेळी तुम्ही मँगो बटर बनवून त्वचेची काळजी घेऊ शकता. मँगो बटर आंब्याच्या रसापासून नव्हे तर त्याच्या बाट्यापासून बनवले जाते. यामुळे त्वचा उजळते तसेच टॅनिंग, सनबर्न, सुरकुत्या आणि फाईन लाईन्स ठिक होतात. आंब्याच्या बाट्यात भरपूर पोषक तत्व असतात. यामध्ये व्हिटॅमिन सी, ई, झिंक, पोटॅशियम आणि कॅल्शियम असते.

मँगो बटरचे फायदे
– टॅनिंगपासून बचाव
– सनबर्न होत नाही
– त्वचेचा ओलावा कायम राहतो
– उन्हाचा परिणाम होत नाही
– स्ट्रेच मार्क हटवते
– फाईन लाईन्स रोखते

एलोवेरा जेलसोबत मिसळून लावा –
उकाडा आणि उन्हामुळे स्किन काळवंडली असेल तर मँगो बटर वितळवून यामध्ये एलोवेरा जेल आणि पुदीना तेल मिसळा. नंतर हे मिश्रण थंड झाल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवा. थंड झाल्यानंतर चेहर्‍यावर लावा. हलक्या हाताने मसाज करा. नंतर थंड पाण्याने धुवून टाका.

मँगो बटर आणि खोबरेल तेल –
स्ट्रेच मार्क्सची समस्या दूर करण्यासाठी मँगो बटरमध्ये खोबरेल तेल मिसळा आणि लावा. हळुहळु स्ट्रेच मार्क्स कमी होतील.