चिदंबरम यांनी घोटाळे करून देशाला लुटले मनिंदरसिंह बिट्टा यांचा आरोप

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – माजी केंद्रीय मंत्री चिदंबरम यांनी घोटाळे करून देशाला लुटले आहे. त्यांच्यावर सक्त कारवाई व्हायलाच हवी, असे अखिल भारतीय दहशतवाद विरोधी आघाडीचे अध्यक्ष मनिंदरसिंह बिट्टा यांनी शिर्डीत पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

आज शिर्डीत आलेल्या बिट्टा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत आजवर कोणी केली नव्हती. हा आजचा हिंदुस्थान आहे, जो चुकेल, घोटाळे करील तो आत जाईल.

…तर नक्षलवाद्यांचे नामोनिशाण राहणार नाही
नक्षलवाद्यांना आता सुधारण्याची संधी आहे. त्यांनी भविष्याचा विचार करावा अन्यथा त्यांचे नामोनिशाण राहणार नाही. त्यांना सध्याचे सरकार जंगलातून काढून ठोकेल, असा इशारा बिट्टा यांनी दिला आहे.

आता पाकव्याप्त काश्मीर हाच मुद्दा
३७० कलम रद्द झाल्याने काश्मिरला नवीन स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे एक राष्ट्र, एक ध्वज, एक संविधान, एक राष्ट्रगीताने काश्मिरला नवी ओळख मिळाली आहे. आता काश्मिरचा नव्हे तर पाकव्याप्त काश्मिर हाच मुद्दा शिल्लक आहे, असेही बिट्टा म्हणाले.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like