माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाच्या हातून ‘कोहिनूर’ निसटला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या मुलाने दादरमधील ‘कोहिनूर ट्विन टॉवर’चा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट गमावला आहे. ९०० कोटी रुपयांचे कर्ज फेडले नसल्यामुळे उन्मेश जोशी यांनी यांच्या हातून  हा महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट  निसटला आहे. हा प्रोजेक्ट आता संदीप शिक्रे आणि असोसिएट्स या आर्किटेक कंपनीला मिळाला आहे. येत्या १५ ते १८ महिन्यात हे काम पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दादरमध्ये शिवसेना भवनासमोरील अतिशय मोक्याच्या ठिकाणी ‘कोहिनूर स्क्वेअर’ हे ट्विन टॉवर बांधण्यात येत होते. पण गेल्या दोन वर्षांपासून या प्रोजेक्टचं काम बंद होतं. यामुळे भांडवल पुरवण्याऱ्या एका कंपनीने जून २०१७  नॅशनल कंपनी लॉ ट्रिबुनलकडे दाद मागितली. ट्रिबुनलने याप्रकरणी निकाल दिल्यानंतर जोशी यांना हा प्रकल्प सोडावा लागला आहे. सुनावणी दरम्यान लवादाने संदीप शिक्रे ॲण्ड असोसिएट (SSA) या कंपनीकडे प्रोजेक्ट सोपवला. तसंच लवादाने या प्रकरणी इंटरिम रिझोल्युशन प्रोफेशनल्स (IRP) म्हणून एस. व्ही. रामकुमार यांची नियुत्ती केली.
असा तयार होईल कोहिनूर टॉवर –
कोहिनूर स्क्वेअरच्या ट्विन टॉवर पैकी एक टॉवर हा ५२ मजल्यांचा तर दुसरा ३५ मजल्यांचा बांधण्यात येणार आहे. यातील एक टॉवर फाइव्ह स्टार हॉटेल्स आणि व्यावसायिक वापरासाठी तर दुसरा टॉवर पूर्णपणे रहिवाशांसाठी बांधण्यात येणार आहे. २००९ मध्ये या प्रोजेक्टचं काम सुरू झालं होतं. पण अनेक अडचणींमुळे हा प्रोजेक्ट लांबत गेला.