The Family Man 2 : ‘द फॅमिली मॅन 2’ च्या पोस्टपॉन होण्यावर बोलला मनोज वाजपेयी ! म्हणाला…

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  बॉलिवूड स्टार मनोज वाजपेयी (Manoj Bajpai) ची वेब सीरिज द फॅमिली मॅन (The Family Man) सीजन 2 बद्दल खूप चर्चा सुरू आहे. या सीरिजचा टीजरही रिलीज झाला आहे. टीजरमधील खास बात अशी होती की, साऊथ सुपरस्टार सामंथा अक्किनेनी (Samantha Akkineni) ची झलक पहायला मिळाली. या सीरिजच्या दुसऱ्या सीजनबद्दल आता चाहत्यांची उत्सुकता आणखीच वाढली आहे. अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ वादात सापडल्यानं आता सीरिजसाठी प्रतिक्षा करावी लागणार असल्याचं बोललं जात आहे. याचा दुसरा सीजन पोस्टपॉन होण्यावर आता मनोजनं भाष्य केलं आहे आणि याची पुष्टीही केली आहे. मनोजनं यावर सकारात्मक भाष्य केलं आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना मनोज वाजपेयी म्हणाला, मला सीरीज पोस्टपॉन होण्याचं कारण कळालेलं नाही. मला अ‍ॅमेझॉनच्या निर्णयावर विश्वास आहे. मी फक्त एवढंच सांगेन जेव्हा कधी येऊ धमाका करत येऊ.

द फॅमिली मॅन 2 ही सीरिज 12 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार होती. परंतु अद्याप याची नवीन रिलीज डेट समोर आलेली नाही. याच्या पहिल्या भागाला खूप प्रतिसाद मिळाला आहे. यानंतर आता चाहत्यांना याच्या दुसऱ्या सीजनबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.