Manoj Jarange | घोषणा देऊन उभ्या आयुष्याचं वाटोळं झालं…! उपोषणकर्ते मनोज जरांगे कार्यकर्त्यांवर भडकले

पोलीसनामा ऑनलाइन – जालना येथे उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) हे मागील आठ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. मराठा आरक्षणासाठी त्यांनी हे उपोषण सुरु ठेवले असून जो पर्यंत सरकारचा जीआर येत नाही तोपर्यंत उपोषणावर बसण्याचा ठाम विचार मनोज जरांगे यांनी केला आहे. विरोधी पक्षातील अनेक बड्या नेत्यांनी मनोज यांची भेट घेतली आहे. यामध्ये शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राज ठाकरे (Raj Thackeray), प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचा समावेश आहे. आज (मंगळवारी) सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी उपोषणस्थळी चर्चा करण्यासाठी आले होते. मात्र, या दरम्यान मराठा आंदोलकांनी व समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. अनेकदा सांगून देखील घोषणा न थांबल्यामुळे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी रागाच्या स्वरामध्ये आंदोलकांना शांतता राखण्यासाठी सुनावले आहे.

मराठा आंदोलक उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची समजूत काढण्यासाठी अनेक नेत्यांनी प्रयत्न केले आहेत. मागील आठ दिवसांपासून ते उपोषणावर असल्यामुळे त्यांच्या प्रकृतीची चिंता देखील त्यांच्या समर्थकांना लागली आहे. याआधी सरकारतर्फे ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) व नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जरांगे यांना समजवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तेव्हा देखील ही चर्चा असफल ठरली होती. यानंतर काल (दि.04) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी मराठा समाजाच्या उपसमितीसोबत बैठक घेतली. यावेळी अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) उपोषणस्थळी उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री मोठी घोषणा करतील, असं खोतकरांनी सांगितलं. परंतु, प्रत्यक्षात सरकारने आंदोलकांकडून एक महिन्याची मुदत मागितली. ही मुदत द्यायची की नाही हा निर्णय मनोज जरांगे यांच्या हातामध्ये आहे. आज पुन्हा सरकारचे शिष्टमंडळ चर्चा करण्यासाठी उपोषणस्थळी आले होते.

आज सरकारच्या शिष्टमंडळामध्ये पुन्हा एकदा गिरीश महाजन उपोषणस्थळी मनोज जरांगे यांची मनधरणी
करण्यासाठी आले होते. मनोज जरांगे यांच्याशी अर्जुन खोतकर, गिरीश महाजन यांची चर्चा सुरू असतानाच आंदोलनकर्त्यांनी उपोषणस्थळी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. घोषणाबाजी करू नका, असं बजावूनही कार्यकर्ते शांत बसले नाहीत. या आवाजामुळे चर्चेत व्यत्यय येत असल्याने मनोज जरांगे पाटील कार्यकर्त्यांवर संताप (Manoj Jarange Angry On Protester) व्यक्त केला. घोषणा देऊन देऊन उभ्या आयुष्याचं वाटोळं झालं असं देखील मनोज जरांगे म्हणाले.

कार्यकर्त्यांना उद्देशून रागामध्ये मनोज जरांदे (Manoj Jarange) म्हणाले की, “सरकारबरोबची चर्चा बंद करायची का?”
त्यांनी आरक्षण दिलं नाही, तरी 50 वेळा सांगितलं घोषणा देऊन देऊन उभ्या आयुष्याचं वाटोळं झालं.
भानावर या ना आता तरी. ते चर्चेला आले आहेत. आपण चर्चा करू, आपल्याला नाही पटलं तर ते परत जातील.
ठरवू ना काय करायचं. लगेच पाहिजे आरक्षण? मग मी कशाला बसलोय? लगेच पाहिजे म्हणूनच बसलोय ना”
अशा संतापजनक सुरामध्ये त्यांनी आंदोलकांना सुनावले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | संदीप कदम यांची घनकचरा विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती; प्रसाद काटकर यांनी झोन चारच्या उपायुक्तपदाचा कारभार घेतला हाती