Manoj Jarange | विशेष अधिवेशन घेऊन कायदा मंजूर करा, मनोज जरांगेंची राज्य सरकारकडे मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी सरकारने विशेष अधिवेशन घेऊन कायदा मंजूर करावा, अशी मागणी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केली आहे. सरकारला पाच हजार पुरावे दिल्याची माहिती त्यांनी दिली. पुण्यातील राजगुरुनगर येथील सभेला संबोधित करताना जरांगे (Manoj Jarange) यांनी ही मागणी केली.

मनोज जरांगे म्हणाले, महिना दीड महिन्यात १४ ते १५ मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या. यापूर्वी देखील मराठा आरक्षणासाठी आत्महत्या झाल्या. त्यांच्या कुटुंबांना मराठा समाज काही कमी पडू देणार नाही. मराठा समाजाचे दु:ख आणि वेदना सहन होत नाही. त्यामुळे गावोगावी जाऊन मराठा माता भगिनींचे आशीर्वाद घेत आहे.

मनोज जरांगे म्हणाले, मराठा आरक्षण आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरु आहे. शांततेच्या मार्गाने मराठा समाजाला आरक्षण द्यायचे हा शब्द आहे. त्या शब्दापासून मागे हटणार नाही. मी शेतकऱ्याचा मुलगा असून शब्द दिला की मागे फिरत नाही.

जरांगे म्हणाले, मी समाजाला आई बाप मानतो, समाजाशी गद्दारी करणार नाही. एकदा शब्द दिला की बदलत नाही.
आपण मोर्चे खूप काढले, सभा घेतल्या पण घराघरातील लोकांनी आरक्षण समजून घेतले नाही.
मोर्चे काढले आणि सभा घेतल्या पण आरक्षण मिळालं नाही. आरक्षण समजून घेणे, त्याच्या मुळाशी जाणे महत्त्वाचे होते.

मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे या मागणीसाठी आंदोलन
सुरु झाले. आपण कुणबी प्रमाणपत्राची मागणी केली आहे. मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का यावर काहीच उत्तर
दिले जात नाही. कुणबी या शब्दाचा सुधारित अर्थ शेती करणारा आहे.

दरम्यान, सभेत मनोज जरांगे बोलत असताना मंचावर येऊन एका युवकाने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.
त्याला बाजूला नेण्यात आले. यावेळी जरांगे यांनी सभेनंतर त्या युवकाशी मी बोलणार असल्याचे सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | हवेली क्रमांक 24 चे सहदुय्यम निबंधक निलंबित, 24 कोटी मुद्रांक शुल्क कमी आकारल्याने कारवाई

Pune Police Mcoca Action | मांजरी परिसरात दहशत माजवणाऱ्या अमोल आडेगावकर व त्याच्या 5 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 70 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

MNS Vasant More – MNS Sainath Babar | वसंत मोरेंच्या उमेदवारीसाठी साईनाथ बाबरांची भूमिका महत्वाची ठरणार? शहराध्यक्षांनी स्वत:च्या उमेदवारीबाबत म्हटले…