Manoj Jarange Patil | भुजबळांचा खबऱ्या जरांगेंच्या गोटात? मनोज जरांगेंनीच दिली माहिती, म्हणाले ”हा घातपाताचा प्रकार…”

जालना : पोलीसनामा ऑनलाईन – Manoj Jarange Patil | सरकार मागण्या मान्य करत नाही आणि तिकडे तो येवल्याचा नेता वाटेल ते बडबडत आहे. तो म्हणतो जरांगे गोधडी पांघरून आत मोबाईलमध्ये काय बघतो ते माहिती आहे. अरे, तुला काय माहिती मी आत काय बघतो. त्याला हे कोण सांगतंय ते मला माहिती आहे. मी त्याला शोधून काढलं आहे. हा घातपाताचा प्रकार आहे. आमचंच खातो आणि मराठ्यांशी गद्दारी करतो. मी त्याला एवढंच सांगेन की त्याने असं काही करू नये, असा आरोप मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी केला आहे.

मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांची आज बैठक घेतली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे सातत्याने मनोज जरांगे यांना लक्ष्य करत आहेत. काल त्यांनी मराठा विधेयक विशेष अधिवेशनात मांडले जात असताना देखील जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र, अंतरवाली सराटीमधील इतंभूत माहिती छगन भुजबळ यांना आपलाच एक माणूस पुरवत असल्याचा आरोप आज जरांगे यांनी केला आहे.

याबाबत बोलताना जरांगे म्हणाले, येवल्याच्या नेत्यानेच त्याला पाठवलं आहे. पण मी त्या गद्दाराला सांगेन की, मराठ्यांशी बेईमानी करू नको. मी आत्ता जे काही बोलतोय ते तो गद्दार ऐकत आहे. रोज आमच्याबरोबर उठतो-बसतो त्यामुळे त्याला समाजात प्रतीष्ठा मिळाली आहे. मी त्या गद्दाराला सांगेन की तू त्याला काही सांगू नको. तो काही तुझा पणजोबा नाही. इथे आंदोलनासाठी बसलेला आंदोलक आपला बाप आहे, त्याच्यासाठी काहीतरी कर. जातीशी गद्दारी करू नको. मी आज जे काही करतोय ते केवळ माझ्या जातीसाठी करत आहे.

भुजबळांना उद्देशून जरांगे म्हणाले, मी माझ्या गोधडीत काय करतो त्याच्या चौकशा तू करू नको. माझ्या गोधडीत घुसू नको.
साल्हेरच्या किल्ल्यावर तू कुठला कार्यकर्ता पाठवला होता ते मला माहिती आहे.
तिथे गर्दीत टेम्पो कसा घुसला तेही मला माहिती आहे. लवकरच मी यावर जाहीरपणे बोलेन.

स्वतंत्र आरक्षणाला विरोध करताना मनोज जरांगे म्हणाले, आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवं आहे.
५४ लाख मराठा कुटुंबांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत.
त्यामुळे आमचा कुणबी जातप्रमाणपत्रासह ओबीसी आरक्षणात समावेश केला जावा.
ज्यांनी ओबीसीतून आरक्षण मागितलं त्यांना हे सरकार आरक्षण देत नाही आणि काही लोकांनी ओबीसीतून आरक्षण
घेण्यास नकार दिला त्यांच्यासाठी स्वतंत्र आरक्षणाचा घाट का घातला जातोय? असा सवाल जरांगे यांनी केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Solapur Rural Police | एमडी ड्रग्स प्रकरणातील आंतर राज्य टोळीचा मुख्य सूत्रधार सोलापूर पोलिसांच्या जाळ्यात

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेकडून मेफेड्रॉन जप्त, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : कोंढव्यात घरकाम करणाऱ्या मुलीवर बलात्कार

पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती गॅस छोट्या सिलेंडरमध्ये भरुन चोरी; लोखंडी पिनद्वारे करत होता गॅस ट्रान्सफर

पुणे : घरच्यांना मारुन टाकण्याची धमकी, ट्यूशनला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत भररस्त्यात गैरवर्तन