Pune Crime News | पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती गॅस छोट्या सिलेंडरमध्ये भरुन चोरी; लोखंडी पिनद्वारे करत होता गॅस ट्रान्सफर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीरपणे घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस काढून तो छोट्या गॅसच्या टाक्यांमध्ये भरण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी (Hinjewadi Police Station एकाला अटक केली आहे. (Pune Crime News)

संतोष मनोहर बंडगर (वय २२, रा. नांदगाव, ता़ मुळशी) याला अटक केली आहे. याबाबत पोलीस शिपाई रवी पवार
यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १९५/२४) दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाळुंगे नांदे रोडवर एक जण बेकादेशीररित्या गॅसच्या टाक्या बाळगून असलची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक तेथे पोहचले. मंगळवारी रात्री त्यांनी स्मशान भूमी रोडवरील पत्र्याच्या शेडवर छापा टाकला. घरगुती गॅस सिलेंडरमधून तो लोखंडी पिनच्या साह्याने गॅस छोट्या टाक्यांमध्ये ट्रान्सफर करुन रिकाम्या टाक्या भरुन घेत होता. पोलिसांनी भारत गॅस कंपनीचे २ सिलेंडर, एच पी कंपनीचे १ सिलेंडर, ईडेन कंपनीचे १ सिलेंडर तसेच छोटे सिलेंडर, वजन काटा, काही रिकामे सिलेंडर, लोखंडी पिन असे साहित्य जप्त केले आहे.
बेकायदेशीररित्या घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस काढून तो छोट्या टाक्यांमध्ये भरून फायदा कमविण्याच्या
प्रयत्नात शहरात अनेकदा मोठ्या आगीच्या घटना घडल्या होत्या.
असे असतानाही अनेक जण असे धोकादायक प्रकार करताना दिसून येत असतात.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | भोगवटा पत्र मिळताच नवीन मिळकत येणार ‘करा’च्या कक्षेत ! बांधकाम विभाग, महावितरण आणि पाणी पुरवठा विभागाची माहितीही होणार शेअर

पुणे: गुन्हे शाखेकडून राजधानी दिल्लीत छापेमारी, 400 किलो ‘एमडी’ जप्त; पुणे पोलिसांकडून तब्बल 2200 कोटी रुपयांचे 1100 किलो एमडी (MD) जप्त (Videos)

Pune PMC News | …तोपर्यंत देवाची उरूळी येथील बायोमायनिंगचे काम सुरू करा – महापालिका आयुक्त विक्रम कुमार