Manoj Jarange Patil | मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात मनोज जरांगेंचा सवाल, सरकारला जातीय दंगली भडकवायच्या आहेत का?

ठाणे : Manoj Jarange Patil | शांततेच्या मार्गाने आमचे आंदोलन चालू आहे. तरीदेखील आमच्यावर गुन्हे दाखल करत आहात. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांना खतपाणी घालत आहात का? राज्यात जो जातीयवाद निर्माण करत आहे, समाजांमध्ये तेढ निर्माण करत आहे त्याला या सरकारचे पाठबळ तर नाही ना? राज्य सरकारला (State Govt) राज्यात जातीय दंगली भडकवायच्या आहेत का? असा गंभीर सवाल मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी केला. ते ठाण्यात पत्रकारांशी बोलत होते.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ठाण्यात मनोज जरांगे यांची भव्य रॅली पार पडली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. मनोज जरांगे म्हणाले, मराठा समाजाने मुख्यमंत्री शिंदे यांच्या शब्दाचा दोन वेळा मान राखला. आम्ही त्यांना पुन्हा २४ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली. त्यानंतर आम्ही कोणाचे ऐकणार नाही. आम्हाला २४ डिसेंबरपूर्वी आरक्षण पाहिजे.

जरांगे (Manoj Jarange Patil) म्हणाले, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमचे सांगणे आहे की, आम्ही शांततेची बाजू मांडतोय. परंतु, बाकीच्या लोकांना राज्यात दंगल भडकावी असे वाटत आहे.
आम्ही शांततेचे आव्हान करत आहोत. हे चुकीचे आहे का?

मनोज जरांगे म्हणाले, रात्रंदिवस प्रशासन अलर्ट असते. मोर्चे, यात्रा, रॅली, सभा हे सगळे दिवसरात्र चालू असते.
क्रिकेटही रात्रीचे चालू असते. त्यामुळे आम्हीदेखील रात्रंदिवस लोकांकडे जात आहोत.
आम्ही शांततेची बाजू मांडत आहोत. आम्ही सरकारची बाजू मांडत आहोत.
राज्यात शांतता नांदण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु, काहींना वाटतंय की राज्यात दंगली व्हायला हव्यात.
परंतु, आमची शांततेची भूमिका असूनही आमच्यावरच गुन्हे दाखल केले जात आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

आमदार अपात्रता प्रकरण : शिंदे गट अडचणीत? सुनावणीत ठाकरे गटाने दिले ‘हे’ पुरावे