Manoj Jarange Patil | अटकेच्या चर्चेनंतर मनोज जरांगेंचा इशारा, म्हणाले – ‘मला अटक करणं सरकारला…’

जालना : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनादरम्यान बीड येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी (Beed Violence Case) पोलीसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. यामध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांना देखील अटक होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यावर स्वत: जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला अटक करणं सरकारला तेवढे सोपं जाणार नाही, असा इशारा जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी दिला आहे.

मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा देताना म्हटले की, मराठा आंदोलकांवरील गुन्हे दोन दिवसांत मागे घेतो, असं सरकारने म्हटलं होतं. पण गुन्हे मागे घेतले नाहीत. त्यामुळे माझ्या अटकेची शक्यता असू शकते. पण मला अटक करणं सरकारला तेवढं सोपं जाणार नाही. मला अटक करायची तर करू द्या. मी तुरुंगात जायला घाबरत नाही. मला अटक झाल्यावर मराठा समाज काय आहे? हे सरकारला कळेल.

मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) म्हणाले, मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना विनंती केली की आंदोलकांची अटक थांबवा. बीडमध्ये जे घडलं ते सत्य आहे. त्याचं आम्ही कधीही समर्थन केलं नाही. पण तुम्ही निष्पाप लोकांना तुरुंगात टाकलं आहे. तीन-चार हजार लोकांच्या याद्या केल्या आहेत. काही पोलिसांची जात उफाळून आली आहे. पोलिसांना कोणतीही जात नसते आणि नसावी. तरच राज्य शांततेत चालू शकतं.

मनोज जरांगे म्हणाले, लोकांनी पोलिसांवर रोष व्यक्त केला नाही पाहिजे. पोलीस हा आपला मित्र आहे. पोलीस आपल्याला आधार देणारा आहे. पोलीस जातीय द्वेष करणार नाही, अशी भावना पाहिजे. माजलगावमध्ये हे सर्रास सुरू आहे. तिथे पोलिसांकडून लोकांबरोबर जातीवाद केला जात आहे, हे व्हायला नाही पाहिजे.

जरांगे पुढे म्हणाले, आमदारांच्या सांगण्यावरून कारवाई करायची, हे चांगलं नाही.
उद्या त्यांना मराठ्यांच्याच दारात यायचं आहे. हे सगळं सरकार करत नसेल, तर सरकारने हे थांबवायला हवं.
कारण गृहमंत्र्यांपेक्षा कोणताही पोलीस मोठा असूच शकत नाही. गुन्हे मागे घेणार असल्याचं सरकारने सांगितलं आहे.
मग तुम्ही आमच्या लोकांना अटक का करत आहात? असा सवाल जरांगे यांनी सरकारला केला.

राज्य सरकारवर (State Govt) आरोप करताना जरांगे म्हणाले, आंदोलकांवरील गुन्हे दोन दिवसांत मागे घेतो,
असं आश्वासन सरकारने दिलं होतं. उपोषण सोडून एक महिना झाला, पण सरकार काहीच करू शकलं नाही.
याचा अर्थ तुम्ही आमच्यावर कोणता तरी डाव टाकला आहे. हे डाव तुम्हाला परवडणार नाहीत.
आम्ही अटक होऊ, तुरुंगात जाऊन बाहेर येऊ पण पुढचे डाव सरकारसाठी अवघड जातील.
याचा सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Navardev BSc Agri | बकासुर आणि सुंदर या स्टार बैलजोडीने केला ‘नवरदेव’चा पोस्टर लॉन्च

Lingayat Vadhu Var | राज्यस्तरीय उच्चशिक्षित लिंगायत वधु-वर पालक परिचय मेळावा 3 डिसेंबरला पुण्यात