Maharashtra Cabinet Meeting | कॅबिनेटमध्ये गँगवॉरसारखी परिस्थिती, एका मंत्र्याच्या… संजय राऊतांच्या आरोपाला हसन मुश्रीफांचे उत्तर

मुंबई : Maharashtra Cabinet Meeting | मुख्यमंत्र्यांना कोणी जुमानत नाही. भाजपवाले त्यांना जुमानत नाहीत. कॅबिनेटमध्ये गँगवॉर सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. एका मंत्र्यांच्या अंगावर दुसरा मंत्री धावून जाण्याची परिस्थिती सुरू आहे, अशी गंभीर टीका शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केली होती. यावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी राऊतांना प्रत्युत्तर करत आव्हान दिले आहे. (Maharashtra Cabinet Meeting)

संजय राऊत म्हणाले होते की, महाराष्ट्रामध्ये कमजोर व अस्थिर सरकार बसले आहे. मुख्यमंत्र्यांना कोणी जुमानत नाही भाजपवाले त्यांना जुमानत नाहीत. कॅबिनेटमध्ये गँगवॉर सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. एका मंत्र्यांच्या अंगावर दुसरा मंत्री धावून जाण्याची परिस्थिती सुरू आहे, ही परिस्थिती याआधी निर्माण झाली नव्हती. मुख्यमंत्री जर आपल्या मंत्र्यांवर नियंत्रण ठेवू शकत नसेल तर मंत्र्यांमध्ये प्रमुख म्हणून बसण्याचा त्यांना अधिकार नाही. (Maharashtra Cabinet Meeting)

यावर प्रतिक्रिया देताना मंत्री हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif) यांनी म्हटले की, राऊतांचा आरोप निखालस खोटा आहे असा कोणताही वाद झालेला नाही. ही चुकीची माहिती आहे. संजय राऊत हे सिद्ध करू शकले की अंगावर धावून वगैरे गेले, तर आम्ही मंत्रीपदाचा राजीनामा देऊ.

मराठा आरक्षणावरून मंत्र्यांमध्ये असलेल्या मतभेदाबाबत हसन मुश्रीफ म्हणाले, ओबीसी आरक्षणाला धक्का न
लावता मराठा आरक्षण द्यावे, अशी सर्वांचीच मागणी आहे. त्यामुळेच आम्ही क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केले आहे.
ज्यांना कुणबी दाखले आहेत, त्यांना ओबीसी आरक्षण द्यावे, असे भुजबळ देखील बोलले आहेत. त्यामुळे कोणताही वाद नाही. कुणीही गैरसमज करुन घेऊ नये.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा या वादावर प्रतिक्रिया देताना हसन मुश्रीफ म्हणाले, राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटाकडे
राहिल की अजित पवार गटाकडे जाईल याचे काय करायचे ते निवडणूक आयोग ठरवेल.
चिन्ह आणि पक्ष हे अजित पवार गटाचे असल्याचा आमचा दावा आहे. यासाठीचे ट्रकभरून पुरावे आम्ही दिले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Firing News | धक्कादायक! पुण्यात सराफा व्यवसायिकावर गोळीबार करुन दागिन्यांची बॅग पळवली, हल्लेखोरांनी झाडल्या 6 गोळ्या

Pune Crime News | ट्रेडिंगमधून मोठा परतावा देण्याच्या आमिषाने पुण्यातील तरुणीची फसवणूक

Pune PMC News | महापालिका प्रशासनाच्या अनियोजीत कामांचा भुर्दंड ‘लाखांमध्ये’

Crime News | कंपनीत पैसे गुंतवणुकीच्या आमिषाने अनेकांची कोट्यवधीची फसवणूक, पुण्यातील प्रकार

NCP Hearing Today in Supreme Court | राष्ट्रवादी पक्ष कुणाचा?; निवडणूक आयोगासमोर आज दुपारी सुनावणी, शरद पवार उपस्थित राहणार

Pune Crime News | बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन घेण्याचा प्रयत्न, पुणे धर्मादाय आयुक्त कार्य़ालयातील 2 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल