Manoj Jarange Patil | ‘तुम्हाला गुन्हे मागे घेता आले नाहीत, आरक्षण काय देणार?’, जरांगे पाटलांनी भाजप नेत्याला सुनावलं

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – Manoj Jarange Patil | राज्य सरकारला (State Government) दिलेला अल्टिमेटम संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. त्यांनी पुन्हा आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे. सरकारला दिलेली मुदत संपली असून आता आरक्षण मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही असा ठाम निश्चय जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या पातळीवर हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी फोन करुन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, जरांगे पाटील यांनी फोनवरच महाजन यांना स्पष्ट शब्दात सुनावलं.

मंत्री गिरीश महाजन यांनी फोनवर मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्यासाठी त्यांना राज्य सरकारची बाजू सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, जरांगे पाटील यांनी उलट गिरीश महाजानांनाच महिन्याभरात आरक्षणाचा निर्णय घेणार होता. त्यासाठीच वेळ दिला होता, त्याचं काय झालं? असा जाब विचारत उपोषण न करण्याचा त्यांचा प्रस्ताव फेटाळून लावला.

काय म्हणाले महाजन?

आरक्षण कायमस्वरुपी व्हायचं असेल तर थोडा वेळ आणखी कळ सोसावी लागेल. पण सगळेच त्यावर अभ्यास करत असून ही सगळी प्रक्रिया अंतिम पायरीवर पोहोचली आहे. तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालू नका. आपल्याला आरक्षण देयचं आहे, पण ते वरवरचं नाही, असं गिरीश महाजन फोनवर जरांगे पाटील यांना म्हटले. (Manoj Jarange Patil)

जरांगे पाटलांचा प्रति प्रश्न

गिरीश महाजनांच्या भूमिकेवर जरांगे पाटील यांनी त्यांनाच प्रतिप्रश्न केला. साहेबांबद्दल आम्हाला आदर आहे.
आम्हाला जर आदर नसता, तर तुम्ही 15 दिवस मागितले आम्ही 30 दिवस दिले असते का? त्यावरही आणखी 10 दिवस वाढवून दिले आम्ही. आता आमचं काय चुकलं सांगा, असा प्रतिप्रश्न जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.

तुम्ही आरक्षण काय देणार?

यावेळी जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांवरील गुन्हे दोन दिवसांत मागे घेण्याबबतचा मुद्दा उपस्थित केला.
आंतरवलीसह महाराष्ट्रातल्या आंदोलकांवरचे गुन्हे दोन दिवसांत मागे घेतो असं म्हणाले होते तुम्ही.
एकही गुन्हा मागे घेतला नाही. तुम्हाला तेही जमलं नाही तर आरक्षण कसलं देताय तुम्ही आम्हाला? आंदोलन चालू
आहे तोपर्यंत गुन्हे मागे घ्यायचे नाहीत अशी तुमची भूमिका दिसतेय, असंही जरांगे पाटलांनी गिरीश महाजन यांना सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation | पिंपरी-चिंचवडमध्ये मराठा आक्रमक! साखळी उपोषणात दिला इशारा…तोपर्यंत नेत्यांचे कार्यक्रम होऊ देणार नाही

Punit Balan Group-Pune PMC News | शासनानेच निर्बंधमुक्त उत्सवाची घोषणा केल्यानंतर जाहिरात फलकाबाबत पुणे मनपाच्या आकाशचिन्ह विभागाने वैयक्तिक आकसापोटी आणि बदनामीच्या हेतूने बजावलेली नोटीस संपुर्णपणे बेकायदेशीर व चुकीचीच

Pune: Drug smuggler Lalit Patil’s escape from Sassoon Hospital: Rosary School Director Vinay Aranha arrested by Pune police