Punit Balan Group-Pune PMC News | शासनानेच निर्बंधमुक्त उत्सवाची घोषणा केल्यानंतर जाहिरात फलकाबाबत पुणे मनपाच्या आकाशचिन्ह विभागाने वैयक्तिक आकसापोटी आणि बदनामीच्या हेतूने बजावलेली नोटीस संपुर्णपणे बेकायदेशीर व चुकीचीच

प्रशासनाने नोटीस रद्द करावी; उद्योजक पुनीत बालन यांची महापालिकेकडे मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Punit Balan Group-Pune PMC News | दहिहंडी उत्सवादरम्यान (Dahi Handi 2023) लावलेल्या जाहिरातींबाबत महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने (PMC Skysign Department ) बजावलेली दंडाची नोटीस ही बेकायदा आहे. वैयक्तिक आकसापोटी आणि बदनामीसाठी ही नोटीस मंडळांच्या ऐवजी माझ्या नावाने बजावून ती माध्यमांपर्यंत पोहोचवण्यात आली. ही नोटीस रद्द करून त्याबाबत प्रसार माध्यमांमध्ये स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी उद्योजक पुनीत बालन यांनी आज महापालिका प्रशासनाकडे केली आहे. (Punit Balan Group-Pune PMC News)

दहिंहंडी उत्सवादरम्यान मंडळांनी लावलेल्या पुनीत बालन ग्रुप आणि ऑक्सीरीच कंपनीच्या जाहिरात फलकांबाबत महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने उद्योजक पुनीत बालन यांना तीन कोटी रुपये दंड भरण्याची नोटीस बजावली आहे. तसेच दंड न भरल्यास बालन ग्रुपच्या मिळकतकरावर बोजा चढविण्यात येईल, असाही इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने ३ ऑक्टोबरला पाठविलेल्या या नोटीसबाबत पुनीत बालन यांनी आज आकाशचिन्ह विभागाला सविस्तरपणे उत्तर दिले आहे. त्यामध्ये वरिल मागणी करण्यात आली आहे. (Punit Balan Group-Pune PMC News)

बालन यांनी पाठविलेल्या उत्तरामध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली १४ सप्टेंबर २०२३ ला झालेल्या बैठकीमध्ये महापालिका प्रशासनाने ४ जानेवारी २०२३ रोजी शासनाला पाठविलेल्या पत्रात शहरातील गणेशोत्सव कालावधीत रस्ता, पदपथावर उभारण्यात येणार्‍या मान्य मापाच्या उत्सव मंडप, स्टेजकरिता पूर्वीपासून कोणतेही परवाना शुल्क आकारण्यात येत नव्हते. तसेच २०१९ पुर्वीपासून पोलिस विभागाकडून मान्यता दिलेल्या स्वागत व रनिंग मंडप परवाना शुल्क देखिल महापालिकेच्या ९ सप्टेंबर २०१९ च्या सर्वसाधारण सभेने रद्द करण्याची मान्यता दिल्याचे व तेंव्हापासून आकारणी केली जात नसल्याचे नमूद केले आहे.

२०१९ गणेशोत्सव कालावधीत, मोहरम, दहीहंडी आणि गणेशोत्सव मंडळांना ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने देण्यात आलेल्या नि:शुल्क परवानगी ही पुढील पाच वर्षांकरिता म्हणजे २०२२ ते २०२७ पर्यंत करण्याचा निर्णय ऑगस्टमध्ये गणेश मंडळे, पोलिस अधीकारी व महापालिका अधिकार्‍यांच्या ऑगस्ट २०२२ रोजी झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.

वास्तविकत: आमच्या कंपन्या या केवळ जाहिरातदार असून जाहिरात फलक हे मंडळांकडून लावण्यात आले आहेत. त्यामुळे जरी महापालिका प्रशासनाला नोटीस बजवायची असली तरी ती जाहिरातदारांऐवजी मंडळांना बजवणे अपेक्षित होते. तसे न करता प्रशासनाने ती जाणूनबुजून व वैयक्तिक आकसापोटी माझी बदनामी करण्यासाठी माझ्या नावे पाठविली आहे. प्रशासनाने जाणीवपूर्वक ही नोटीस माध्यमांना पाठवून ती प्रसिद्ध करवून आणली आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने मला पाठविलेली नोटीस रद्द करावी आणि ती रद्द केल्याबाबत प्रसारमाध्यमांना देखिल कळवावे. शासनानेच निर्बंधमुक्त उत्सवाची घोषणा केलेली असताना प्रशासनाने दंड, विद्रुपीकरण शुल्काची मागणी आमच्याकडे करणे बेकायदेशीर आहे. अशी वसुली मिळकतकरातून करण्याचा उल्लेखही बेकायदेशीर आहे, याची प्रशासनाने नोंद घ्यावी, अशी मागणी पुनीत बालन (Punit Balan) यांनी प्रशासनाला दिलेल्या खुलाश्याद्वारे केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Indrani Balan Foundation | इंद्राणी बालन फाऊंडेशनकडून लोणी धामणी शाळेला स्कुल बस भेट

Pune Drug Case | ड्रग्स माफिया ललित पाटील पलायन प्रकरण: रोझरी स्कूलचा संचालक विनय अरहानाला पुणे पोलिसांकडून अटक