Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंचे आमदार, खासदारांना आवाहन, राजीनामे नको, मुंबईतच थांबा, सांगितली ‘ही’ नवी रणनिती

जालना : Manoj Jarange Patil | राज्यभर मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलन आक्रमक झाले आहे. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांनी अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांवर देखील आपला रोष व्यक्त केला. यानंतर मराठा समाजाच्या दोन खासदार आणि तीन आमदारांनी राजीनामा (MLA Resignation) दिला आहे, शिवाय अनेक पदाधिकाऱ्यांनी देखील पदांचा राजीनामा दिला आहे. हे राजीनामा सत्र सुरू असताना सर्व खासदार आमदारांना आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी वेगळेच आवाहन केले असून नवी रणनिती सांगितली आहे.

मनोज जरांगे यांनी म्हटले की, आपण कोणाला राजीनामा द्या म्हटले नाही. आमदारकी, खासदारकीचा राजीनामा देताना समाजाचा तोटा होणार नाही याचा विचार करावा. तसेच सर्व आमदार, खासदारांनी, माजी मंत्र्यांनी मुंबईत थांबून आरक्षण मिळेपर्यंत शासनाचा पिच्छा सोडू नये.

मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) हे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज ७ वा दिवस आहे. तसेच राज्यभर साखळी उपोषण ठिकठिकाणी सुरू आहेत. राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. असे असताना दुसरीकडे आमदार, खासदारांचे राजीनामा सत्र सुरू झाले आहे. अनेकांनी मुबई गाठली असून, तेही राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.

मात्र, आज सकाळी जरांगे यांनी पत्रकारांना माहिती देताना म्हटले की, काही खासदार, आमदारांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा का दिला आहे, हे माहीत नाही. त्यांना आम्ही राजीनामा देण्यास सांगितले नव्हते. त्यांच्या राजीनामा दिल्यामुळे मराठा समाजास काय फायदा होणार आहे आणि काय तोटा होईल, हे माहीत नाही.

मनोज जरांगे पुढे म्हणाले, आमदारकी किंवा खासदारकी असेल तर ते सरकारवर दबाब तरी आणू शकतील.
परंतु राजीनामे दिले तर ते रिकामे बसतील. आम्हीही रिकामे आणि तेही रिकामे. आत बोलायला कोणी तरी पाहिजे.

मराठा आरक्षणावर मत मांडताना मनोज जरांगे म्हणाले, अगोदरच ६० टक्के मराठा ओबीसी आरक्षणात
(OBC Reservation) गेला आहे. थोडे राहिले आहेत. त्यामुळे एकदम ५ कोटी समाज ओबीसीत येईल हा गैरसमज दूर करा.
उर्वरित थोडा समाज बाकी आहे. त्यामुळे विशेष अधिवेशन घेवून मराठा समाजाला आरक्षण द्या, त्याला चॅलेंज होणार नाही.

जरांगे पुढे म्हणाले, ज्यांना आरक्षण घ्यायचे ते घेतील ज्यांना घ्यायचे नाही ते घेणार नाहीत.
परंतु, अर्धवट आरक्षण घेणार नाही. आई-बापाच्या कष्टाचे चीज होण्याची वेळ आली आहे.
शांततेचे युद्ध आपण जिंकणार आहोत. पहिल्या टप्प्यात, दुसऱ्या टप्प्यात काय होते ते पाहू.
आणखी आंदोलनाचा तिसरा व चौथा टप्पा बाकी आहे. बंद करून काय होणार. थोडे थांबा आपण पाहू काय होते ते.
बंद करू नका, उद्रेक करू नका, असे आवाहन त्यांनी मराठा समाज बांधवांना केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | मांजरी गॅस सिलेंडर स्फोट प्रकरणात 4 जणांवर FIR, गोडाऊन मालकाला अटक

Praneti Lavange Khardekar | प्रणेती लवंगे खर्डेकर यांची नागपूर जिल्ह्यासाठी मानद वन्यजीव रक्षक म्हणून नियुक्ती