Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis | मनोज जरांगे पुन्हा संतापले, ”देवेंद्र फडणवीस हे मुद्दाम करतायेत, तुम्ही सगळ्यांनी शांत राहा”

छत्रपती संभाजीनगर : Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis | अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाच्या बैठकीत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले होते. यानंतर सरकारने मराठा आंदोलकांभोवती (Maratha Andolan) कारवाईचा फास आवळण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांनी संचारबंदी, नाकाबंदी केल्याने मुंबईकडे जाण्याचा कार्यक्रम जरांगे यांनी रद्द केला असला तरी आज त्यांनी पुन्हा एकदा फडणवीस यांच्यावर आपला संताप व्यक्त केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (Maratha Reservation)

मनोज जरांगे म्हणाले, सरकारला शेवटची विनंती. मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नका. मराठ्यांनी साखळी उपोषण आणि धरणे आंदोलनात करावे. जनता मालक की सरकार बघूया. मराठा समाजातील वकिलांना विनंती आहे, ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत त्यांच्यासाठी लढा. वकिलांनी मोफत लढावे. न्यायालयातून जामीन करून घ्या. देवेंद्र फडणवीस हे मुद्दाम करत आहेत. तुम्ही सगळ्यांनी शांततेत राहा. मी बघतो काय करायचे.(Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis)

जरांगे म्हणाले, घटनेने आम्हाला मुलभूत स्वातंत्र्य दिलं आहे. संचारबंदी लागू करता. मराठ्यांविषयी एवढा खुनशीपणा दाखवता. मराठ्यांच्या बाजूने आमदारांनी बोलायला पाहिजे. तुम्ही नेत्यांसाठी बोलता. पक्षाच्या नेत्यासाठी आमदार बोलत आहेत, पण मी मराठा समाजासाठी बोलत आहे. ते नेत्याकडून बोलत आहेत, मला दोषी ठरवत आहेत. नेत्याला जातीपेक्षा मोठे समजायला लागले आहेत.

मराठा नेत्यांना सुनावताना जरांगे पुढे म्हणाले, तू नेत्याकडून बोल. पण चूक केली तर सोडणार नाही. मराठा समाजावर माझी निष्ठा आहे. मी फटकळ बोलत आहे असं काहींना वाटेल, पण समाजाविरोधात गेला तर मी बोलतो. मी समाजाला दैवत मानलं आहे.

जरांगे म्हणाले, गोरगरिब मराठा समाजासाठी मी लढत आहे. सगेसोयरे आणि ओबीसीतूनच आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही. माझ्याविरोधात बोलायला काहींना सांगितले. नाईलाजास्तव पक्षातील आमदार माझ्याविरोधात बोलतील. पण मराठा समाजाने माझ्यासोबत राहावे. फडणवीस हे मराठ्यांविरोधात काम करणारच. सहा महिन्यात मी फडणवीसांवर केलेला आरोप दाखवा.

मनोज जरांगे म्हणाले, अंतरवालीतील गुन्हे जाणूनबुजून ठेवलेत. कुठे ना कुठे गौप्यस्फोट करणे गरजेचे होते. संचारबंदी लावायला कापाकापी झाली होती का? कशी लावली? आम्ही दहशतवादी आहोत का? मराठ्यांवर हा अन्याय आहे.

ते पुढे म्हणाले, मराठ्यांनी घाबरण्याची गरज नाही. आपण कोर्टात जाऊ. काय करायचे ते करू द्या.
तुम्ही मर्यादा तोडली म्हणून आम्ही बोललो. आम्ही त्यादिवशी पुढे सरकलो असतो, तर पोलिसांनी लाठीचार्ज केला असता.
आमच्यासोबत ५ हजार महिला आणि २५ हजार कार्यकर्ते होते. जर काही घडलं असतं तर संपूर्ण राज्य बेचिराख झालं
असतं म्हणून आम्ही मागे सरकलो.

जरांगे म्हणाले, पोलिसांकडून काही झालं असतं तर राज्यातला मराठा पेटून उठला असता.
आम्ही शहाणपणाचा निर्णय घेतला. तुम्ही स्वागत करायला पाहिजे.
तुम्ही मराठा आमदारसोबत घेतले. १० टक्के आरक्षणाविरोधात लोकांनी कोर्टात धाव घेतली.

सरकारला इशारा देताना मनोज जरांगे म्हणाले, तुमच्या हातातून वेळ गेलेली नाही आणखी रोष घेऊ नका.
काय गुन्हे दाखल करायचे ते करा. आम्ही न्यायालयातून जामीन घेऊ. तुम्ही जिंकणार नाही, तुम्हाला हा पठ्ठ्या हरवणारच.
मराठ्यांना न्याय द्या हीच माझी मागणी आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime | पिंपरी : ऑनलाईन टास्कच्या बहाण्याने जिम ट्रेनरला 35 लाखांचा गंडा

CM Eknath Shinde | ”लिमीटच्या बाहेर गेलं की कार्यक्रम करतोच मी…”, नाना पटोलेंशी बोलतानाचा मुख्यमंत्र्याचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

Pune Dhayari Crime | कामगारांचे पैसे देण्यास उशीर केल्याने तरुणाला मारहाण, धायरी परिसरातील घटना