CM Eknath Shinde | ”लिमीटच्या बाहेर गेलं की कार्यक्रम करतोच मी…”, नाना पटोलेंशी बोलतानाचा मुख्यमंत्र्याचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

मुंबई : CM Eknath Shinde | राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Legislative Budget Session) आजपासून सुरू झाले आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधीमंडळच्या समोर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) समोरासमोर आल्यानंतर त्यांच्यात झालेले बोलणे, सध्या चर्चेचा विषय झाले आहे. या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून मुख्यमंत्री हे मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांना उद्देशून बोलल्याचे म्हटले जात आहे.

आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांनी फसवणूक नको, आरक्षण द्या, असे म्हणत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला घेरले. याचवेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress Nana Patole) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेला संवाद सोशल मीडियातून समोर आला आहे. हा संवाद जरांगे पाटील यांच्या आंदोलनाशी संबंधित आहे, असे बोलले जात आहे.

काल अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले.
ते मला सलाईनमधून विष देऊन मारण्याचा प्रयत्न करत आहेत, मला संपवण्याचा कट रचला असे आरोप जरांगे यांनी केले.
यानंतर ते फडणवीसांच्या मुंबईतील सागर बंगल्यावर जायला निघाले होते.

मात्र, यामुळे एकुणच स्थिती बिघडत चालली होती.
हा प्रकार सुरू असताना मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन तीव्र शब्दात सरकारची भूमिका मांडली.
कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, असेही म्हटले. त्यानंतर, आज विधिमंडळ सभागृहाबाहेरील हा व्हिडिओ समोर आला आहे.

व्हिडिओत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नाना पटोले हे विधिमंडळाच्या पायऱ्यांजवळ बोलत असल्याचे दिसत आहे.
त्यावेळी, नाना पटोले जरांगेंच्या आंदोलनाबाबत भाष्य करतात. हे काय चाललंय.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे : अमेरिकेहून गिफ्ट पाठवण्याचे आमिष, महिलेची तब्बल 13 लाखाची फसवणूक

Manoj Jarange Patil | अखेर मनोज जरांगे यांच्यावर दोन ठिकाणी गुन्हा दाखल, सरकारने कारवाईचा फास आवळला

Pune Warje Malwadi Crime | अश्लील हावभाव करुन डॉक्टर तरुणीचा विनयभंग, वारजे पोलिसांनी तरुणाला ठोकल्या बेड्या

पिंपरी : बनावट नोटा बाळगणाऱ्या तरुणाला देहूरोड पोलिसांकडून अटक

Pune Cheating Fraud Crime | मोठी ऑर्डर देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची 40 लाखांची फसवणूक, आरोपीला कर्नाटकातून अटक; वारजे माळवाडी पोलिसांची कामगिरी

Gazal Singer Pankaj Udhas Passed Away | प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचे निधन