Manoj Jarange Patil On Maratha Reservation | मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप, मराठा आरक्षणासाठीच्या आत्महत्यांना शासन जबाबदार

जुन्नर : Manoj Jarange Patil On Maratha Reservation | मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आज पुणे दौऱ्यावर असून त्यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आज दिवसभर त्यांच्या विविध ठिकाणी सभा झाल्या. या सभांमधून त्यांनी राज्य सरकारवर जोरदार आसूड ओढले आहेत. मराठा आरक्षणासाठी झालेल्या आत्महत्यांना शासन जबाबदार असल्याचा गंभीर आरोप जरांगे यांनी यावेळी केला आहे. ते जुन्नर येथे बोलत होते. (Manoj Jarange Patil On Maratha Reservation)

मनोज जरांगे म्हणाले, आरक्षण मिळविण्यासाठी मराठा समाजाच्या तरुणांचे मुडदे पडायला लागले आहेत. ते आत्महत्या करत आहेत, याला शासन जबाबदार आहे. आरक्षण देण्यासाठी सुरू झालेले हे शांततेचे आंदोलन मोडण्याची ताकद राज्य आणि केंद्रातील कोणत्याही शक्तीत नाही.

जरांगे पाटील म्हणाले, सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे. २४ तारखेनंतर शांततेत आंदोलन होईल. परंतु ते शांततेचे आंदोलन शासनाला पेलणारे नाही, हे मी शिवनेरी गडावरून जाहीर करतो. शासनाने आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. (Manoj Jarange Patil On Maratha Reservation)

जरांगे म्हणाले, आमचे आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा, पूर्वज कुणबी होते. त्यांचे आम्ही रक्ताचे वंशज आहोत.
शेतीला ते कुणबी असे म्हणायचे आता सुधारित शब्द शेती आहे. त्यावेळी शेती करणाऱ्याला कुणबी असे म्हणत.
आम्ही सर्व कुणबीच आहोत. आम्हाला दोन प्रकारचे अंग आहे. आम्ही क्षत्रिय लढणारे मराठा आहोत,
दुसरे शेतीतच पाय ठेवतो, शेतीत असतो, देशाला अन्नधान्य पुरवतो.

मराठा समाजला आवाहन करताना जरांगे म्हणाले, मराठा समाजाचे प्रेरणा केंद्र किल्ले शिवनेरी आहे.
जिजाऊंनी अन्यायाविरुद्ध लढण्यास शिकवले तसेच शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले. समाजाने शांततेत आंदोलन करावे,
आत्महत्या करू नका. यापुढे समाजात जाऊन आरक्षण कशासाठी पाहिजे याची माहिती द्या.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap Case | पोलीस चौकीत लाच घेताना पोलीस कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Punit Balan Group Felicitates Rituja Bhosle | पुनीत बालन ग्रुपच्या पाठीब्यामुळेच सुवर्णपदकाला गवसणी; ऋतुजा भोसले हिचे उद्गार (Video)