Manoj Jarange Patil | जरांगे यांनी सरकारकडे केल्या ‘या’ मागण्या, तोपर्यंत सर्व शिक्षण मोफत करा, सरकारने रात्रीपर्यंत…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारने (State Govt) मान्य केल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिली. मात्र, यानंतर वाशी येथे समाजबांधवांशी संवाद साधताना जरांगे यांनी आणखी काही जुन्याच मागण्या सरकारच्या समोर ठेवल्या असून रात्रीपर्यंत याबाबत निर्णय घेण्यासाठी वेळ दिला आहे. तत्पूर्वी जरांगे यांनी राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत तासभर चर्चा केल्यानंतर या मागण्या केल्या आहेत. (Manoj Jarange Patil )

राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत केलेल्या चर्चेनंतर जरांगे यांनी वाशीतील मैदानात जाहीर सभेत समाज बांधवांसमोर बाजू मांडली. यावेळी मनोज जरांगे यांनी राज्य सरकारसमोर आपल्या मागण्या ठेवल्या आहेत. तसेच, आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, असा इशारा दिला आहे.

जरांगे यांनी जाहीर भाषणातून मागण्यांची यादी वाचून दाखवताना म्हटले की, राज्य सरकारने अद्याप मराठा समजातील आंदोलकांवर झालेले गुन्हे मागे घेतलेले नाहीत. त्यामुळे, अंतरवाली सराटीसह राज्यात सर्वत्र दाखल झालेले गुन्हा मागे घेण्यात यावेत. सरकारने गुन्हे मागे घेतल्याचे पत्र दिले नाही.

जरांगे म्हणाले, सगेसोयरे या शब्दावर आम्ही ठाम असून सरकारने सगेसोयरे शब्दाचा अध्यादेश काढा.
त्यानुसार, सगेसोयऱ्यांकडून शपथपत्र लिहून घेतल्यानंतरच संबंधित कुटुंबाला आरक्षणाचे प्रमाणपत्र द्यावे.
सरकारने रात्रीपर्यंत अध्यादेश काढावा.

तसेच आणखी मागण्या मांडताना जरांगे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजातील
विद्यार्थ्यांना सर्वच क्षेत्रातील शिक्षण मोफत करा. तसेच, सरकारी नोकरीतील जागांची भरती सरकारने करु नये,
जागांची भरती करायची असेल तर मराठा समाजाच्या जागा रिक्त ठेऊन भरती करावी.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Deepak Kesarkar | जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा निघाला?, मंत्री केसरकरांनी केले मोठे वक्तव्य

Pune Pimpri Chinchwad Crime News | मंदिरात दान करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाला लुटले, धायरी येथील प्रकार

पुणे शहरात चोरट्यांचा सुळसुळाट, घरफोडीच्या तीन घटनांमध्ये हिरेजडीत दागिन्यासह रोकड लंपास

जामिनदाराची बनावट सही करुन दोघांची फसवणूक, पतसंस्थेच्या अध्यक्ष, कोषाध्यक्ष, सचिव यांच्यावर FIR; सदाशिव पेठेतील प्रकार