मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण ! NIA आणि ATS चा वाद पोहोचला न्यायालयात

ADV

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) लावला असून मात्र या प्रकरणाचा तपास NIA कडे देण्यावरून वाद निर्माण झाला आहे. यावरून आता हा वाद कोर्टात गेला आहे. हिरेन प्रकरणाचा तपास NIA ला देण्यात यावा अशी मागणी ATS कोर्टात केली आहे. तसेच ATS ने आतापर्यंत केलेला तपास आणि तपासाची कागदपत्रे वस्तूजन्य पुरावे, तांत्रिक पुरावे, परिस्थितीजन्य पुरावे, अटक आरोपी आणि या प्रकरणाशी संबंधित असलेली प्रत्येक गोष्ट ही आमच्याकडे सुपूर्द करावी अशी मागणी NIA यांच्या याचिकेत करण्यात आली आहे.

हिरेन प्रकरणाचा तपास ६ मार्चपासून एटीएस करत आहे. परंतु, २० मार्चपासून हा तपास NIA ला सुपूर्द करावा असे आदेश केंद्रीय गृह विभागाने दिले होते. त्यानंतर या सोमवार (दि.२२) मार्चला NIA आणि राज्याच्या गृह खात्याकडे तसेच राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्याकडे मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास सुपूर्द करण्याबाबत कायदेशीर व्यवहार केले. परंतु, दोन्हीकडून NIA ला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.

ADV

तसेच, परिणामी यासंबंधीची असणारी माहिती NIA ने मुंबई सत्र न्यायालयामध्ये दिली. त्याचबरोबर हिरेन हत्या प्रकरण ज्या ठाणे कोर्टात आहे. त्या ठाणे कोर्टातील ATS न्यायालयात एक याचिका केली आहे. हिरेन हत्याप्रकरणाचा संबंध हा रोडवर स्फोटकांनी भरलेल्या हिरव्या रंगाच्या गाडीचा असून या हत्या प्रकरणाचा तपास NIA ला दिला गेल्यास या हत्येप्रकरणात बरोबरच रोडवर ठेवण्यात आलेल्या हिरव्या रंगाच्या स्कॉर्पिओ कार प्रकरणातील तपासात गती येऊन या दोन्ही प्रकरणातील गुंतागुंत सुटून दोन्ही प्रकरण सोडवता येतील. असे या याचिकेत म्हटले आहे. मात्र, हिरेन हत्या प्रकरणाचा तपास राज्य सरकार NIA ला देण्यास जराही इच्छुक नसल्याने, एटीएसला हिरेन हत्याप्रकरणाचा उलगडा लवकरात लवकर करण्याचे आदेश देण्यात आल्याचे देखील ATS पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास एटीएस करणार की NIA करणार हा वाद फक्त ठाणे न्यायालय पुरता मर्यादीत न राहता आगामी काही दिवसांत मुंबई हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्ट इथपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे हिरेन हत्याप्रकरणाचा उलगडा एटीएस करणार की NIA याला अधिक महत्त्व दिले जात आहे. तर केंद्रीय तपास यंत्रणा विरुद्ध राज्य तपास यंत्रणा असाच वाद आता मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी पाहायला मिळत आहे.