Mansukh Hiren Death Case । मनसुख हिरन यांच्या हत्येनंतर आरोपींचे पर्यटन, NIA चा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mansukh Hiren Death Case ।  प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या निवासस्थानी स्फोटकांनी भरलेली कार आणि नंतर मुबईचे प्रसिद्ध व्यापारी मनसुख हिरन (Mansukh Hiren) यांची हत्या या विषयावरून मागील काही महिन्यापासून राज्यात वातावरण तापलं आहे. त्याचा आजही क्रमाने तपास सुरु आहे. तर याबाबत राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) तपासात आणखी एक माहिती समोर आली आहे. मनसुख हिरन (Mansukh Hiren Death Case) यांच्या हत्येनंतर संतोष शेलार (Santosh Shelar) आणि आनंद जाधव (Anand Jadhav) हे दिल्ली तसेच इतर शहरांचा फेरफटका मारून आले होते, अशी माहिती तपासात पुढं आलीय.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराजवळ एका कारमध्ये स्फोटके सापडल्याप्रकरणी ही नवी माहिती समोर आली आहे. या गाडीचे मालक मनसुख हिरन (Mansukh Hiren) यांची चार मार्चला हत्या केल्यानंतर हे 2 आरोपी अगोदर दिल्लीला गेले. त्याखेरीज दिल्लीजवळच्या अन्य शहरांतदेखील ते फिरले होते. या दोघांच्या मोबाइल फोन आणि इंटरनेट तपशिलावरुन हि माहिती उघडकीस आलीय. या दरम्यान, विशेष म्हणजे त्यांच्या या प्रवासाचा खर्च इतर व्यक्तीने केला होता. ती व्यक्ती नेमकी कोण, याचा NIA तपास करीत आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : mansukh hiren death case santosh shelar and anand jadhav going delhi and other city after murder of mansukh hiren

हे देखील वाचा

Amrita Fadnavis | लसीकरणाची आकडेवारी देत अमृता फडणवीसांचे ट्विट, म्हणाल्या –
‘हो, मी भक्त अन् त्याचा मला अभिमान’

विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍याला डॉक्टरांनी वाचविले ‘प्राण’;
पण त्याने खिडकीतून उडी घेऊन केली ‘आत्महत्या’

OBC Reservation | ओबीसी आरक्षणाला भाजपचा नेहमीच विरोध;
एकनाथ खडसेंची भाजपसह देवेंद्र फडणवीसांवर टीका

UP Religion Conversion Case |
उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर धर्मांतराचं बीड कनेक्शन आलं समोर,
PM मोदींनी कौतुक केलेल्या तरुणाला अटक