Maratha Reservarion | मराठा आरक्षणप्रश्नी भुजबळांनी सभागृहाला दिली गंभीर माहिती, मला गोळी मारली जाईल, असा पोलिसांचा अहवाल

नागपूर : Maratha Reservarion | सकाळी उठलो आणि पाहिलं की सुरक्षा वाढवली आहे. सुरक्षा का वाढवली याची चौकशी केली तेव्हा पोलीस म्हणाले, वरून इनपूट आले आहे की भुजबळांना गोळी मारली जाईल. पोलिसांचा अहवाल आहे, अशी गंभीर माहिती आज छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सभागृहात दिली. मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) विरूद्ध छगन भुजबळ वाद सध्या वाढला असून या वादाबाबत भुजबळ यांनी सभागृहाला माहिती दिली. (Maratha Reservarion)

मराठा आरक्षण आणि ओबीसींचा विरोध याबाबत छगन भुजबळ सभागृहात बोलत होते. पोलिसांच्या अहवालावर आणखी भाष्य करताना भुजबळ म्हणाले, हरकत नाही. मी मरायला तयार आहे. माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही. त्यांना वेगळे आरक्षण द्या.

भुजबळ म्हणाले, आज छगन भुजबळ आहे, प्रकाश सोळंके झाला. उद्या मी असेन. आपण त्यावर गप्प बसणार का? कोणी त्याचा निषेध करणार नाही? कोणी बघायला जाणार नाही? आज महाराष्ट्रासमोर हाच माझा प्रश्न आहे. (Maratha Reservarion)

पाऊण तासाच्या आपल्या भाषणात छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर देखील टीका केली. यावेळी भुजबळ यांनी काही वृत्तपत्रांच्या बातम्यांची कात्रणे सभागृहासमोर ठेवली, या बातम्यांचे मथळे वाचून दाखवताना ते म्हणाले, यात आमच्या हातात दंडुके, सरकारला पायाखाली तुडवू शकतो, जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल, मी त्याचा कार्यक्रमच करतो, आमच्या हातात दंडुके, सरकारला पायाखाली तुडवू शकतो, भुजबळांनाही पाहून घेऊ, असे म्हटले आहे.

यावेळी एक पत्रक सभागृहात वाचून दाखवताना ते म्हणाले, २४ डिसेंबरला नाशिकला भुजबळ नॉलेज सिटी, भुजबळ फॉर्म, ज्यांना कोणाला पाहायचे आहे, त्यांनी नावे कळवावी. याचा अर्थ माझ्यावर हल्ला करण्याची तयारी सुरू झाली. प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागरचे झाले, आता माझ्यावरही हल्ला होणार, असे भुजबळ म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Lok Sabha By Election | निवडणूक आयोग आणि भाजपला हायकोर्टाची चपराक – मोहन जोशी

Pune Lok Sabha By-Election | पुणे लोकसभेसाठी लवकरात लवकर पोटनिवडणूक घ्या, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

Pimpri Chinchwad Crime News | बिलाच्या पावत्या एडीट करून पैशांचा अपहार, वायसीएम हॉस्पिटलमधील प्रकार

MLA Disqulification Case | आमदार अपात्रता प्रकरण : ‘या’ कारणासाठी विधानसभा अध्यक्ष देऊ शकतात राजीनामा, रोहित पवारांचं मोठं वक्तव्य

Maharashtra Winter Session 2023 | संसदेतील घुसखोरीच्या घटनेचे विधानसभेत पडसाद, अध्यक्षांनी घेतला महत्वाचा निर्णय

NCP MLA Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांचा घणाघात, नेहमीच सर्व महत्वाची पदे अजितदादांना देणं, हीच शरद पवारांची सर्वात मोठी चूक