NCP MLA Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांचा घणाघात, नेहमीच सर्व महत्वाची पदे अजितदादांना देणं, हीच शरद पवारांची सर्वात मोठी चूक

नागपूर : NCP MLA Jitendra Awhad | राष्ट्रवादी सत्तेत आल्यानंतर नेहमीच सर्व पदे अजित पवारांना (Ajit Pawar) दिली गेली किंवा त्यांच्या मान्यतेने दुसऱ्यांना दिली गेली. शरद पवारांची (Sharad Pawar) हीच सर्वांत मोठी चूक आहे. जे करायचे ते अजितने करायचे, उपमुख्यमंत्री अजित पवारच, दुसरे कोणते महत्त्वाचे पद असेल तरीही अजित पवार आणि पक्षात हे सगळ्यांना माहीत होते. पण कोणी बोलत नाही आणि मी बोलतो, एवढाच फरक आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांनी अजित पवार गटावर केला.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, विरोधी पक्षनेता होण्यासाठी अजित पवारांनी १९ ते २० आमदारांच्या सह्या घेतल्या आणि ते पत्र शरद पवारांना दिले होते. मात्र यात माझी सही नव्हती. कारण मला विरोधी पक्षनेते करा, यासाठी मीच पवारांना एक कॉन्फिडेंशियल पत्र लिहिले होते. अजित पवारांना विरोधी पक्षनेते होण्यासाठी कोणीही जबरदस्ती केलेली नव्हती.

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, विरोधी पक्षनेतेपदासाठी मी शरद पवारांना पत्र लिहिले, पण ते मला मिळणारच नव्हते.
कारण मोठ्या पदांसाठी तिथे केवळ नऊ जणच हकदार होते. आयुष्यात दुसरी पिढी वर आलीच नसती. नवी पिढी आली पाहिजे की नाही? शरद पवारांनंतर तुम्हाला उचलले गेले ना? पण तुम्ही तुमच्यानंतर कोणाला वर आणले का? मी…मी आणि फक्त मीच, माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही, अशी अजित पवारांची भूमिका होती.

२०१९ च्या अजित पवारांच्या भाजपसोबत सत्तेत जाण्याच्या निर्णयाबाबत जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad)
म्हणाले, राष्ट्रवादीत यंदा घडलेले बंड हे पहिले नाही. यापूर्वी २०१९ ला देखील अजित पवार यांनी शरद पवारांचा विरोध
डावलून आपल्या समर्थक आमदारांसह भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती.

आव्हाड पुढे म्हणाले, तेव्हा ५४ आमदारांच्या सह्यांचे पत्र राष्ट्रवादीच्या कार्यालयातील गर्जे नावाच्या क्लार्कने
अजित पवारांना दिले. ते पत्र घेऊन अजित पवार राज्यपालांकडे गेले, मात्र नंतर ४० आमदार पुन्हा शरद पवारांकडे आले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | खडकी अ‍ॅम्युनिशन फॅक्टरी परिसरातून चंदनच्या झाडाची चोरी, दोघांना अटक

ट्रेलर ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, नगर – पुणे रोडवरील घटना

Pune Police MPDA Action | चतु:श्रृंगी परिसरात दहशत माजवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 68 वी स्थानबध्दतेची कारवाई

Actor Ravindra Berde Passed Away | ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन; अस्सल विनोदाचा धडाका हरपला

Comedian Santosh Chordia Passed Away | एकपात्री हास्यवी संतोष चोरडिया यांची अचानक एक्झिट; ह्दयविकाराच्या झटक्याने निधन

किरकोळ वादातून तरुणाचा निर्घृण खून, हडपसर परिसरातील घटना; एकजण ताब्यात