Maratha Reservation | माजलगावात आंदोलनाला हिंसक वळण, राष्ट्रवादी आमदाराच्या घरावर दगडफेक, गाड्यांची जाळपोळ, न.पा. कार्यालय जाळले

माजलगाव : Maratha Reservation | मराठा आंदोलनाला आज माजलगावमध्ये हिंसक वळण लागले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar Group) आमदार प्रकाश सोळंके (MLA Prakash Solanke) यांच्या सोशल मीडियावर कथित व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे मराठा आंदोलकांच्या संतापाचा भडका उडाला. आज सकाळी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी सोळंकेंच्या बंगल्यावर तुफान दगडफेक केली, नंतर बंगल्याच्या पार्किंगमधील वाहने जाळली. (Maratha Reservation)

तसेच आंदोलकांनी घरातील साहित्यालाही आग लावल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे पोलीस दलाची एकच धावपळ उडाली. पोलिसांनी जमावाला शांत करून या परिसरातून बाहेर काढले.

मात्र, आंदोलक तेथून बाहेर पडल्यावर शहरातील मुख्य मार्गावर आले आणि दगडफेक सुरू केली. दरम्यान, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर (SP Nand Kumar Thakur) व पोलिसांचा फौजफाटा शहरात पोहोचला होता.

यानंतर आंदोलकांनी आमदार सोळंके यांच्या ताब्यातील शैक्षणिक संस्था, सहकारी संस्थांच्या इमारतींवर दगडफेक केली. संस्थांसमोर टायर जाळले.

यानंतर हिंसक झालेला जमाव नगर पालिकेत (Majalgaon Municipal Corporation) गेला.
नगरपालिका कार्यालयात घुसून आंदोलकांनी जाळपोळ केली. या मुळे शहरात प्रचंड तणावाचे वातावरण आहे. (Maratha Reservation)

ठिकठिकाणी आमदार सोळंके यांच्या विरोधात आंदोलक जोरदार घोषणाबाजी करत आहेत.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर माजलगावचे राष्ट्रवादीचे आ. प्रकाश सोळंके यांची एक कथीत ऑडीओ क्लीप
व्हायरल झाली होती. यात त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते, असा आरोप मराठा
समाजाने केला आहे. याच कारणामुळे आज माजलगावमध्ये मराठा समाज आक्रमक झाला होता.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | सिंहगड रोड परिसरात भरदिवसा गोळीबार, प्रचंड खळबळ

Pune Crime News | डेटिंग अ‍ॅपवर ओळख, ‘डांगडिंग’ करण्यासाठी तरूणाला हॉटेलमध्ये बोलावून लुटणाऱ्या परप्रांतीय महिलेसह तिचा साथीदार गजाआड; सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई