Pune Crime News | डेटिंग अ‍ॅपवर ओळख, ‘डांगडिंग’ करण्यासाठी तरूणाला हॉटेलमध्ये बोलावून लुटणाऱ्या परप्रांतीय महिलेसह तिचा साथीदार गजाआड; सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | डेटिंग अॅपवर (Online Dating App) ओळख झाल्यानंतर हॉटेलमध्ये रुम बुक करण्यास सांगून तरुणाला भेटण्यासाठी येऊन लुटणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Department (SS Call) अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेले आरोपी परप्रांतिय असून त्यांना नवी मुंबई येथील तुर्भे मधून अटक केली आहे. (Pune Crime News)

पुणे शहरातील, राज्यातील तसेच राज्याबाहेरील लोकांना सीकींग अॅडव्हेंचर (Seeking Adventure) या डेटिंग अॅपद्वारे आकर्षीत करुन व चॅटींग (Chatting) करायचे. त्यांना मोबाईलवर मुलीचे फोटो पाठवून हॉटेल बुक करायला लावायचे. त्यानंतर ग्राहकाकडून ठरलेली रक्कम ऑनलाईन घेऊन तसेच दमदाटी मारहाण करुन जास्तीचे पैसे घेऊन ग्राहकांचे मौल्यवान वस्तूंची चोरी केल्याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) अनोळखी महिला व पुरुषावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना आरोपी हे त्यांची ओळख लपवुन गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले. सामाजिक सुरक्षा विभागाने (Pune Police SS Call) आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले विविध इलेक्ट्रॉनिक गॅझेटचे तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करुन गुन्ह्यातील महिला (वय-21 रा. उत्तराखंड) व तिचा साथीदार (वय-25 रा. दिल्ली) या दोघांना नवी मुंबईतील तुर्भे येथून अटक केली. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपींना पुढील कारवाईसाठी चंदननगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. (Pune Crime News)

आरोपींकडे केलेल्या प्राथमिक तपासात त्यांनी पुणे शहर तसेच इतर राज्यातील महत्त्वाच्या शहरामध्ये नामांकित
हॉटेलमध्ये ग्राहकांना रुम बुक करण्यास सांगून जबरी चोरी केल्याची माहिती मिळत आहे. असा प्रकार कोणासोबत
घडला असल्यास त्यांनी गुन्हे शाखेच्या सामाजिक गुन्हे शाखेकडे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

ही कारावीई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव
(Sr PI Bharat Jadhav), सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे (API Rajesh Malegave),
सहायक पोलीस फौजदार राजेंद्र कुमावत, पोलिस अंमलदार सागर केकाण, पोलीस अंमलदार मनिषा पुकाळे, तुषार भिवरकर, इम्रान नदाफ यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation | होम ग्राऊंडवर नामुष्की! अजित पवारांच्या पोस्टरला फासले काळे

Pune Drug Case | ललित पाटील पलायन प्रकरण : ससून रुग्णालयाचे डीन मेहरबान असल्याचा पुरावा आला समोर

Pune Police MCOCA Action | पुण्यातील अट्टल गुन्हेगार बाबुलाल मोहोळ व त्याच्या 3 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 73 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA