Maratha Reservation | उद्या मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णयाची शक्यता कमीच, फडणवीसांचे संकेत; म्हणाले…

मुंबई : Maratha Reservation | राज्य सरकारला मराठा समाजाच्यावतीने आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी दिलेली ४० दिवसांची वेळ उद्या संपत आहे. सरकार कोणता निर्णय घेणार याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असताना आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जे वक्तव्य केले आहे त्यावरून उद्या मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता कमीच असल्याचे दिसत आहे. (Maratha Reservation)

जरांगे यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम उद्या २४ ऑक्टोंबर रोजी संपत आहे, याबाबत प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रयत्न समन्वयाचा आहे. जे प्रश्न जटील असतात आणि ज्यात संविधान, न्यायपालिका यांचा समावेश असतो त्यात विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागतो. आज एखादा घाईघाईत निर्णय घेतला आणि तो न्यायालयात टिकला नाही तर पुन्हा लोकांकडून टीका होईल. समाजाला मूर्ख बनवण्याकरता तुम्ही निर्णय घेतला असे लोक म्हणतील. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी काल सांगितल्याप्रमाणे टिकणारा निर्णय आम्ही घेऊ. (Maratha Reservation)

फडणवीस म्हणाले, जोपर्यंत आमचे सरकार होते तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात त्यावर स्थगिती आली नाही. मी या गोष्टीत राजकारणात जाणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिबद्धता सांगितली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की मराठा आरक्षण देणारच. आम्ही त्यांच्या पाठिशी पूर्णपणे उभे आहोत. गंभीर प्रश्न असल्याने तो सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणारच आहोत.

दरम्यान, उद्या राज्य सरकारला मराठा समाजाने दिलेली ४० दिवसांची मुदत संपत असल्याने पुढे काय होणार,
याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे सरकारने निर्णय न घेतल्यास पुढील आंदोलनाची दिशा मनोज जरांगे
यांनी ठरवली असून उद्यापासून आंदोलन सुरू होणार आहे. हा प्रश्न राज्य सरकार कशाप्रकारे हाताळते हे महत्वाचे ठरणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Water Supply News | पुण्यातील काही भागाचा गुरुवारी पाणीपुरवठा बंद

MCA Joins Hands With Punit Balan Group | एमसीएचा महाराष्ट्रातील क्रिकेट विकासाला चालना देण्यासाठी पुनित बालन ग्रुपसोबत करार