Maratha Reservation | मराठा आरक्षणाचा आवाज संसदेत, छत्रपती संभाजीराजेंचा पुढाकार; राज्यातील खासदारांची सोमवारी बैठक!

नवी दिल्ली : राज्यात मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) वातावरण तापले आहे. मात्र, सरकारमधील मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि काही आमदारच मराठा आरक्षणाला आणि नेतृत्वाला विरोध करत असल्याने आता मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) आवाज संसदेत पोहचवण्यासाठी छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी पुढाकार घेतला आहे. सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन (Parliament Winter Session 2023) सुरू असून राज्यातील सर्व खासदार दिल्लीत आहेत. त्यामुळे सोमवारी संभाजीराजे यांनी खासदारांची बैठक बोलावली आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) संसदेत भूमिका मांडण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यातील सर्व लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांची संयुक्त बैठक सोमवार, १८ डिसेंबर रोजी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे बोलावली आहे. बैठकीचे निमंत्रण राज्यातील सर्व खासदारांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), नारायण राणे (Narayan Rane) तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनाही दिले आहे.

छत्रपती संभाजीराजे यांनी बोलावलेल्या बैठकीला किती खासदार उपस्थित राहणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मागणीला छत्रपती संभाजीराजे यांनी यापूर्वीच पाठिंबा दर्शविला आहे.
आता यासाठी त्यांनी स्वता पुढाकार घेत खासदारांची बैठक बोलावली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

धक्कादायक! पत्नी WhatsApp वर चॅटिंग करते म्हणून गळफास देऊन जीवे मारण्याचा केला प्रयत्न, औंध मिलिटरी कॅम्पमधील प्रकार

Manoj Jarange Patil | ”फडणवीस त्यांना बोलायला लावतात, म्हणून ते बोलतात”, नितेश राणेंच्या टीकेवर जरांगेंचे प्रत्युत्तर, सरकारला दिला इशारा

Pune Police MCOCA Action | फटाके फोडण्यावरुन तरुणावर कोयत्याने वार करणाऱ्या फहीम खान टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 98 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

NEMS School Pune | युद्धकला आणि शिवकालीन मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकानी रंगला एन.ई.एम.एस. शाळेचा वार्षिक क्रीडा दिन 850 विद्यार्थांनी घेतला सहभाग