Maratha Reservation- Latur Farmer Suicide | मराठा आरक्षणासाठी आत्महत्यांचे सत्र थांबेना, संयम सुटला, आणखी एकाने जीवन संपवलं

लातूर : Maratha Reservation- Latur Farmer Suicide | राज्यात मराठा आरक्षणासाठी दररोज आत्महत्या होत आहेत. दुसरीकडे राज्य सरकार मराठा आंदोलनाकडे पुर्णपणे दुर्लक्ष करत आहे. तर आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची प्रकृती ढासळत चालली आहे. यामुळे आंदोलकांचा संयम सुटू लागला आहे. आत्महत्यांचे सत्र थांबत नसल्याने अस्वस्थ करणारी स्थिती निर्माण झाली आहे. काल पुण्यातील आळंदी येथील आत्महत्येनंतर आज लातूर तालुक्यातील गोंद्री गावात मराठा आरक्षणासाठी शरद भोसले यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. (Maratha Reservation- Latur Farmer Suicide)

भोसले यांच्या आत्महत्येमुळे गोंद्री गावात तणावाचे वातावरण असून प्रशासन दाखल झाले आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक आल्याशिवाय आणि लेखी आश्वासन दिल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईक आणि गावकऱ्यांनी घेतल्याने वातावरण चिघळण्याची शक्यता आहे. (Maratha Reservation- Latur Farmer Suicide)

खबरदारी म्हणून लातूर ग्रामीण, औसा, किल्लारी येथील पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांना या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात केले आहे.

शरद भोसले यांनी शेतातील आपट्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे की, मराठ्यांना हक्काचे आरक्षण का दिले जात नाही? मराठा समाजाचा अंत पाहू नका. मराठा समाजातील सहनशीलता आता संपत आहे. लवकर आरक्षण मिळाले नाही तर मराठा समाज सामूहिक आत्महत्या करेल.

शरद भोसले यांचा मृतदेह शवविच्छेदणासाठी हसेगाव येथील रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
भोसले यांच्या पश्चात पत्नी कोमलबाई, अश्विनी आणि राणी या दोन मुली आणि आई,
वडील, दोन भाऊ, दोन भावजया, पुतणे असा परिवार आहे.

काल पुण्यातील आळंदी येथे मराठा आरक्षणासाठी व्यंकट ढोपरे या ज्येष्ठ नागरिकाने इंद्रायणी नदीत उडी मारून
आत्महत्या केली होती. आज लातूरमध्ये आणखी एक आत्महत्या नोंदली गेली.
यामुळे मराठा समाजात अस्वस्थता पसरली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil To Maharashtra Govt | मनोज जरांगेंनी दिला इशारा,
मी आणखी दोन दिवसच बोलू शकतो, माझं हृदय बंद पडलं तर…