Maratha Reservation | राज्यात मराठा आरक्षण कायदा लागू, शासन निर्णयासह राजपत्र जारी

मुंबई : Maratha Reservation | विशेष अधिवेशनात मंजूर करण्यात आलेल्या मराठा आरक्षण विधेयकावर आता राज्यपालांनी स्वाक्षरी केल्याने त्याचे कायद्यात रूपांतर झाले आहे. मराठा आरक्षण कायद्याची अंमलबजावणी २६ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. त्यामुळे आता मराठा समाजाला स्वतंत्र संवर्गांतर्गत नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण लागू झाले आहे. (Maratha Reservation)

महाराष्ट्र शासनाने याबाबतचा शासन निर्णय, बिंदुनामावली आणि राजपत्रही जारी केले आहे. कायदा आणि
न्यायपालिका विभागाचे सचिव सतीश वाघोले यांनी त्यावर सही केली आहे.

दरम्यान, आधीपासून सुरु असलेल्या शासकीय नोकरभरतीसाठी हे आरक्षण लागू नाही. २६ फेब्रुवारी आणि त्यानंतरच्या नोकऱ्यांमध्ये मराठा समाजासाठी १० टक्के जागा आरक्षित असतील.

मराठा समाजाला स्वतंत्र संवर्गांतर्गत नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण राज्यात लागू झाल्यानंतर प्रतिक्रिया
देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण लागू झाले आहे.
याचा फायदा मराठा तरुणांना नोकरीत आणि शिक्षणात होईल. कोणत्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला
कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण दिल्याचा मला आनंद आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | खडकी परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेरांना अटक, 13 लाखांचा मुद्देमाल जप्त

Pune Congress-Mohan Joshi | झोपडीधारकांचे पुनर्वसन त्याच ठिकाणी व्हावे अन्यथा आंदोलन करू – माजी आमदार मोहन जोशी

Takalkar Classes Tilak Road | पोलिसांच्या मुला-मुलींसह नातेवाईकांसाठी खूशखबर ! टाकळकर क्लासेस टिळक रोड शाखेमध्ये अ‍ॅडमिशन सुरू; 8 वी, 9 वी, 10 वी CBSE व SSC बोर्डासाठी तसेच 11 वी, 12 वी सायन्स विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत