Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी आज जालन्यात उसळणार जनसागर, गर्दीचा विक्रम मोडणार, जरांगे यांच्या भाषणाकडे लक्ष

ADV

जालना : आंतरवाली सराटी गावात आज मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जाहीर सभा होत आहे. या सभेसाठी राज्यभरातून मराठा बांधव दाखल झाले आहेत. गर्दीचे विक्रम मोडणारी ही सभा ऐतिहासिक होईल, असा अनेकांचा अंदाज आहे. सभेत मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) काय बोलणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. जरांगे यांच्या सभेपूर्वी समाजामध्ये फूट पाडण्याचे राजकारण देखील झाल्याने याचे तीव्र पडसाद सभेमध्ये उमटू शकतात. (Maratha Reservation)

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी होत असलेल्या या सभेत आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या भाषणाकडे
सर्व राज्याचे लक्ष लागले आहे. शिवाय, सत्ताधारी नेत्यांची धडधड देखील वाढली आहे. कारण मराठा आंदोलनात सरकार फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याने मनोज जरांगे पाटील काही गौप्यस्फोट करू शकतात. काही मंत्री देखील सातत्याने आरक्षणविरोधी (Maratha Reservation) वक्तव्ये करीत आहेत, त्यांचाही समाचार जरांगे घेऊ शकतात.

ADV

राज्यव्यापी दौरा करून मोठी जनजागृती आणि वातावरण निर्मिती जरांगे यांनी केल्याने आजच्या सभेला एक
दिवस आधीपासूनच मराठा बांधव आंतरवाली सराटी गावात दाखल झाले आहेत.
त्यामुळे आजच्या सभेला लाखोंची गर्दी होण्याची शक्यता आहे. यासाठी त्यानुसार सोय देखील करण्यात आली आहे.

दरम्यान, जरांगे पाटलांनी सरकारला ४० दिवसांची मुदत दिली होती. ती २४ ऑक्टोबरला संपत आहे.
त्यामुळे २४ पासून मराठा आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Police Inspector Promotion ACP / DySP | राज्यातील 104 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना सहाय्यक पोलिस आयुक्त / पोलिस उपअधीक्षक पदी बढती