Maratha Reservation | पंतप्रधान मोदींकडून मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याची ग्वाही, उदयनराजे, रणजितसिंह यांनी घेतली भेट

फलटण : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) दिल्लीत झालेल्या सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना याप्रश्नी लक्ष घालण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanaraje Bhosale) आणि माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर (MP Ranjitsinh Naik-Nimbalkar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत पंतप्रधानांनी ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळाले पाहिजे, अशी भूमिका घेऊन सकारात्मक विचार करून यावर तोडगा काढण्याची ग्वाही दिली.

यावेळी दोन्ही खासदारांनी धनगर आरक्षणाचा (Dhangar Reservation) प्रश्न देखील पंतप्रधानांच्या समोर मांडला. यावेळी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका देखील मांडली.

दोन्ही खासदारांनी पंतप्रधानांना सांगितले की, महाराष्ट्रातील मराठा समाजाने देशासाठी बलिदान दिले आहे. सर्व समाजातील समाजघटकांना बरोबर घेऊन जाणारा हा समाज आहे; परंतु आता समाजातील मुले-मुली व कुटुंबाची अर्थिक परिस्थिती भयावह झाली आहे.

खासदारांनी पंतप्रधानांना सांगितले की, समाजातील मुला-मुलींना शिक्षणासाठी फी भरणे अवघड आहे. पालकांना जमीन विकून, बँक व खासगी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागत आहे. शिक्षण झाल्यानंतर नोकरीची शाश्वती नाही. त्यामुळे कुटुंबाची परिस्थिती वाईट आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करावेत.

धनगर आरक्षणाबाबत पंतप्रधान मोदी यांना विनंती करताना खासदार म्हणाले की,
महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमातींमध्ये आरक्षण मिळाले पाहिजे.
यासाठी हा समाज अनेक वर्षे झटत आहे.
इतर राज्यांमध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळाले आहे.
परंतु, महाराष्ट्रात शब्दांचा खेळ झाला आहे.
महाराष्ट्रात धनगड शब्द नसल्याने आरक्षण मिळत नाही.
तरी याबाबत आपण लक्ष घालावे व समाजाला आरक्षण द्यावे.

दोन्ही खासदारांनी केलेल्या विनंतीवर पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी या दोन्ही विषयांवर सकारात्मक विचार केला जाईल.
लवकरच तोडगा काढू, असे आश्वासन दिले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | कामगारांनी बेकरीतील 8 लाखांची रोकड पळवली, भवानी पेठेतील घटना

CM Eknath Shinde On Caste Wise Census | जातनिहाय जनगणनेसाठी मुख्यमंत्री सकारात्मक, समाजातील सर्व घटाकांचे मत ऐकून निर्णय घेऊ आणि…