Maratha Reservation Protest | राधाकृष्ण विखेपाटील यांचे जरांगे यांना आवाहन; उद्धव ठाकरे व शरद पवारांवर साधला निशाणा

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Maratha Reservation Protest | मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Caste Certificate) देण्यात यावे आणि आरक्षण मिळावे अशी प्रमुख मागणी घेत मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केली होती. यासाठी जरांगे या मागणीसाठी त्यांनी मागील 10 दिवसांपासून अन्नाचा कण घेतलेला नाही. उपोषणाची तीव्रता लक्षात घेत राज्य सरकारकडून (State Government) आज जीआर काढण्यात आला. या जीआरमध्ये (Maratha Reservation GR) स्पष्ट करण्यात आले की, ज्यांचेकडे दोन पिढ्यांआधीचे कुणबी असल्याचे पुरावे आहेत त्या मराठा समाजाला (Maratha Reservation Protest) कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

मात्र सरकारचा हा जीआर मान्य नसल्याची भूमिका मनोज जरांगे यांनी व्यक्त केली. सर्वांना सरसकट आऱक्षण देण्याची मागणी ते आता करत आहेत. पण यावर आता राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी त्यांची भूमिका मांडली असून मनोज जरांगे यांची प्रमुख मागणी पूर्ण झाली असून त्यांनी विषय जास्त ताणू नये असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. सोबत त्यांनी महाविकास आघाडीचे (MVA) नेत्यांना मराठा आरक्षणावरुन खडे बोल सुनावले आहे.

सोलापूरमध्ये (Solapur) माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आरक्षणावरुन चालू असलेल्या उपोषणाबद्दल आणि सरकारने काढलेल्या जीआरबद्दल राधाकृष्ण विखे पाटील यांनी मत मांडले आहे. विखे पाटील म्हणाले की, “कुणबी मराठा आरक्षणाबाबत कालच मुख्यमंत्र्यांनी त्यांचे धोरण स्पष्ट केले आहे. मराठवाड्यातील सर्व गाव ही निजाम संस्थानात होती. त्यासाठी महसूल सचिवांच्या नेतृत्वात एक समिती गठीत केली आहे. ज्या मराठ्यांकडे निजामशाहीच्या काळात ‘कुणबी’ असल्याचे पुरावे असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. हे सर्व करताना ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्याची आमची कोणतीही भूमिका नाही. राज्य सरकारने मनोज जरांगे यांची प्रमुख मागणी पूर्ण केली आहे.” त्यामुळे आता विषय जास्त ताणू नये अशी विनंती राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उपोषणकर्त्यांना केली आहे.

त्याचप्रमाणे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महाविकास आघाडी मधील नेत्यावर हल्लाबोल केला आहे. शरद पवार इतकी वर्ष सत्तेत राहिलात, जाणता राजा म्हणून फिरत राहिलात. मात्र त्यांनी आरक्षणासाठी कधी प्रयत्न केले आहेत का असा टोला विखे पाटलांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना लगावला आहे. तसेच त्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘कर्तृत्वशून्य मुख्यमंत्री’ असा उल्लेख केला आहे. ते पुढे म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणासाठी काय केलं? या सगळ्याची श्वेतपत्रिका राज्य सरकार काढणार आहे. त्यावेळेस मराठा बांधवांना खरी परिस्थिती कळेल.

आता तुम्ही जालन्यात उपोषणस्थळी जाऊन भाषणं देत आहात.
पण तुम्ही तुमच्या काळात मराठा बांधवांचं एवढं नुकसान केले आहे की, तुम्हाला बोलण्याचा नैतिक अधिकार नाही.
कर्तृत्वशून्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची लक्तरं आता वेशीवर टांगली जातील.
लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी तुम्ही समाजबांधवांना भडकावण्याचा प्रयत्न करत आहात.
शरद पवार इतकी वर्ष सत्तेत राहिलात, जाणता राजा म्हणून फिरत राहिलात.
मात्र त्यांनी आरक्षणासाठी कधी प्रयत्न केले आहेत का असे ऐकिवात नाही.
शरद पवार यांनी ते मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणासाठी काय प्रयत्न केले. केंद्रात मंत्री असताना काय प्रयत्न केले?
महाविकास आघाडीचे मार्गदर्शक म्हणून काय प्रयत्न केले. हे लोकांना कळू द्या.”
अशा शब्दामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार अ‍ॅक्शन मोडवर, 10 लाखाची लाच घेणार्‍या बडया अधिकार्‍याची हकालपट्टी