Maratha Reservation | 16 जूनपासून मराठा समाजाच्या मूक आंदोलनाला कोल्हापुरातून सुरुवात

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) प्रकरणी आता राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती (Rajya Sabha MP Sambhaji Raje Chhatrapati) यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. आता समाज बोलणार नाही, तर आता आमदार, खासदार आणि मंत्री बोलतील असं म्हणत त्यांनी मूक आंदोलन (Silent movement) छेडलं आहे. 16 जूनपासून कोल्हापुरातून (Kolhapur) या आंदोलनाची सुरुवात होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मराठा समाजाने आतापर्यंत संयम दाखविला, आता आक्रमकता काय असते ती दाखवू, असा आक्रमक पवित्रा घेत एक इशारा त्यांनी दिला आहे. कोल्हापूर शहरातील शासकीय विश्रामगृहावर गुरुवारी सकल मराठा समाजाच्या प्रमुख समन्वयकांच्या घेतलेल्या बैठकीत खासदार संभाजीराजे (MP Sambhaji Raje Chhatrapati) बोलत होते.

बैठकीदरम्यान बोलताना खा. संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) म्हणाले, 16 जून रोजी होणारं हे आंदोलन कोल्हापूरातल्या शाहू महाराजांच्या समाधीस्थळापासून सुरु होईल.
राज्याच्या 36 जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
ते म्हणाले, आत्तापर्यंत समाज खूप बोलला पण आता आपण नाही बोलायचं.
आता आमदार, खासदार, मंत्री बोलतील.
आता मराठा समाजाच्या आरक्षणाची (Reservation of Maratha community) जबाबदारी आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी घेतली पाहिजे.
तसेच, नाशिक, अमरावती, औरंगाबाद, रायगड या जिल्ह्यातही मूक आंदोलने होतील.
त्याचबरोबर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुण्यातून थेट मंत्रालयावर लाॅगमार्च काढला जाईल आणि त्यात महाराष्ट्रातील सकल मराठा सहभागी होईल.
असा इशाराही खा. संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी दिला आहे.

Ajit Pawar | पुणेकरांना दिलासा तर पिंपरी चिंचवडकरांची निराशा, सोमवारपासून निर्बंध आणखी शिथिल

या दरम्यान, संभाजीराजे यांनी मोर्चा ऐवजी राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारक समाधी स्थळाजवळ मूक आंदोलन (Silent movement) करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
पुढे संभाजीराजे म्हणाले, पहिल्या टप्प्यात कोल्हापूर, नाशिक, अमरावती, संभाजीनगर, रायगड या पाच जिल्ह्यात मूक आंदोलने होतील.
त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात जायचे, हे समन्वयक ठरवणार आहेत.
पुढे प्रत्येक जिल्ह्याच्या समन्वयकांशी चर्चा करून लॉग मार्चची तारीख निश्चित केली जाईल.
सर्व 36 जिल्ह्यांतील मराठा समाजाला पुण्यात आणून तेथून थेट मंत्रालयावर लॉगमार्चची सुरुवात होणार असल्याच खा. संभाजीराजे यांनी स्पष्ट केले आहे.

परमबीर सिंह यांच्याविरूध्द आणखी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल, जाणून घ्या प्रकरण

Web Title : maratha reservation silent agitation maratha community five districts starting kolhapur 16th june