Maratha Reservation | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक, आता राज्यव्यापी दौरा करणार, म्हणाले – ‘सत्ताधारी, विरोधकांनी दडपण आणलं तरी…’

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करत असलेले मनोज जरांगे (Manoj Jarange) पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. आता जरांगे हे राज्यव्यापी दौरा करणार असून १४ ऑक्टोबरला राज्यव्यापी मेळावा घेणार आहेत. ते अंतरवाली, सराटी येथे बोलत होते. यावेळी इशारा देताना ते म्हणाले, आरक्षणाविना मराठा समाजाच्या (Maratha Reservation) पाच पिढ्या बरबाद झाल्या. यापुढील पिढ्या बरबाद होऊ देणार नाही. सत्ताधारी, विरोधकांनी कितीही दडपण आणले तरीही आता माघार नाही.

मराठा समाजाची विचार मंथन बैठक अंतरवाली सराटी येथे शनिवारी घेण्यात आली. येथील साखळी उपोषणाचा (Chain Hunger Strike) नवव्या दिवशी शनिवारी रेणापुरी गावातील ग्रामस्थ सहभागी झाले होते. यावेळी जरांगे बोलत होते. राजकीय नेत्यांवर टीकास्त्र सोडताना जरांगे म्हणाले, त्यांच्याकडे असे कोणतेही हत्यार व शक्ती नाही की त्याचा वापर करून ते मला फोडू शकतील. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत त्यांचा डाव चालणार नाही.

जरांगे पुढे म्हणाले, सत्ताधारी, विरोधी पक्षातील नेत्यांची शान मराठा समाजाने वाढविली आहे.
आता कोणी नागपूरला, कोणी कोल्हापूरला, तर कोणी पुण्याला जाऊन उचकावत आहेत.
कोणी कितीही उचकावले तरी मराठा समाज व ओबीसी (OBC) समाज वाद घालणार नाही व आम्ही समोरासमोर येणार नाहीत.

राज्य सरकारला इशारा देताना मनोज जरांगे म्हणाले, दिलेल्या मुदतीत शासनाने आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी पूर्ण करावी, अन्यथा आमरण उपोषण पुन्हा सुरू केले जाईल.
राज्यातील समाज बांधवांनी शांततेत आंदोलन करावे, कोठेही उद्रेक करू नये.
मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं. त्यांना पुरावे कुठे मागताय.
आमच्याकडे गाड्यांच्या गाडे पुरावे असूनही आम्हाला आरक्षण नाही.

राज्यव्यापी दौऱ्याची माहिती देताना मनोज जरांगे म्हणाले, दोन दिवसात गुन्हे परत घेतो असे राज्य सरकारने सांगितले होते.
परंतु, अद्याप गुन्हे परत घेतलेले नाहीत. यामुळे आता आरक्षणाचा लढा आणखी तीव्र करावा लागणार आहे.
यासाठी राज्यव्यापी मेळावा घेतला जाणार आहे. मेळाव्याला ३५ लाखावर मराठा समाज बांधव येणार आहेत.
मेळाव्यासाठी १० ते १२ दिवसांचा राज्यव्यापी दौरा करणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | महिला डॉक्टरची सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या, डॉक्टर पतीसह चार जणांवर FIR; दिघी परिसरातील घटना