Pune Pimpri Chinchwad Crime News | महिला डॉक्टरची सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या, डॉक्टर पतीसह चार जणांवर FIR; दिघी परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | दवाखाना बांधण्यासाठी माहेरवरून पैसे आणावेत, यासाठी सासरच्या मंडळींनी केलेल्या छळाला कंटाळून महिला डॉक्टरने सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या (Female Doctor Suicide In Pune) केली. ही घटना 15 सप्टेंबर रोजी हवेली तालुक्यातील डुडुळगाव येथे घडली होती. याप्रकरणी मृत महिलेच्या पतीसह चार जाणांवर दिघी पोलीस ठाण्यात (Dighi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

डॉ. अपर्णा अभिजीत शिंदे (वय-33) असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. याबाबत डॉ. अपर्णा शिंदे यांचा भाऊ घन:शाम भानुदास पवार (वय-31 सध्या रा. पुर्णानगर, पिंपरी मुळ रा. कोल्हार खुर्द, ता. राहुरी जि. नगर) यांनी दिघी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी डॉ. अपर्णा शिंदे यांचा पती डॉ. अभिजीत अशोक शिंदे Dr Abhijeet Ashok Shinde (वय-40 रा. अमुल्यम सोसायटी डुडुळगाव), सासरे डॉ. अशोक बाबुराव शिंदे Dr Ashok Baburao Shinde (वय-67 रा. कोल्हार भगवतीपुर ता. राहता, जि. नगर) यांच्यासह सासू आणि नणंद यांच्यावर आयपीसी 498(अ),306,323,504,34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घन:शाम यांच्या बहिणीचा विवाह डुडुळगाव येथे अमूल्यम सोसायटीत राहणाऱ्या डॉ. अभिजीत शिंदे याच्यासोबत झाला होता. लग्न झाल्यानंतर पती, सासरा, सासू, नणंद यांनी पैशांच्या मागणीसाठी छळ केला. दवाखाना बांधण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत या मागणीसाठी अपर्णा यांना जमिनीवर नाक घासायला लावून मारहाण केली. त्यांना घरातून बाहेर काढले होते. त्यानंतर, त्या 15 सप्टेंबरला सासरी गेल्या होत्या. त्यावेळी संशयितांना पुन्हा माहेरहून पैसे आणावेत यासाठी तगादा लावला. त्याला कंटाळून डॉ. अपर्णा यांनी सातव्या मजल्यावरील प्लॅटच्या बाल्कनीतून खाली उडी मारुन आत्महत्या केली. पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Girish Mahajan On Eknath Khadse | ‘त्यांना सगळी पदं आपल्याच घरात पाहिजेत’, खडसेंच्या ‘त्या’ विधानावर गिरीश महाजनांचा टोला

Teachers Recruitment In Maharashtra | टीईटी गैरप्रकार प्रकरणातील उमेदवारांना संधी, स्व-प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ

Rohit Pawar | शरद पवार व गौतम अदानी भेटीवर रोहित पवारांनी मांडले स्पष्ट मत; म्हणाले…

Pune Crime News | विमाननगर येथील फिनिक्स मॉलच्या सातव्या मजल्यावरुन पडून तरुणाचा मृत्यू

MP Supriya Sule Shares Photo Of Balasaheb Thackeray & Sharad Pawar | ठाकरे –
पवारांवरील जनतेचे प्रेम भाजपाला बघवत नाही, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल; म्हणाल्या – ‘कटकारस्थाने करून…’

वेबसिरीजमध्ये काम देण्याच्या आमिषाने अभिनेत्रीची फसवणूक, पुण्यातील प्रकार