Maratha Reservation | ‘जरांगे यांच्याकडून औषध-पाण्याचा त्याग, वैद्यकीय तपासणीलाही नकार’, डॉक्टर म्हणाले…

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – Maratha Reservation | मराठा समाजाला सरसकट ‘कुणबी’ असे जातीचे दाखले देण्याची मागणी करत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे अंतरवाली सराटी येथे गेल्या 14 दिवसांपासून उपोषणास बसले आहेत. त्यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी सरकारकडून सातत्याने आवाहन होत असलं तरीही त्यांनी उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान त्यांनी कालपासून (दि.10) पाणी आणि औषधाचा त्याग केला असून वैद्यकीय तपासणी करण्यासही विरोध केला आहे. याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला असून त्यांची प्रकृती खालावत आहे. (Maratha Reservation)

गेल्या 14 दिवसांपासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी काल सकाळपासून पाणी पिणे, उपाचर घेणे बंद केले आहे. काल दुपारी व रात्री त्यांनी तपासणी करु दिली नाही. त्यामुळे त्यांची शुगर, बिपी तपासता आले नाही. डॉक्टरांनी रविवारीही दोन वेळेस विनवणी केली. परंतु जरांगे यांनी तपासणी व उपचार घेण्यास नकार दिला. वैद्यकीय पथक सोमवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास उपोषणस्थळी आले होते. पथकातील डॉ. अतुल तांदळे (Dr. Atul Tandale) यांनी बीपी, शुगर सह इतर तपासण्या करु द्या, अशी जवळपास अर्धातास विनवनी केली. मात्र, त्यांनी तपासणी,उपचारालाही नकार दिला.

कालपासून पाणीही प्यायले नाहीत. शरीरातील पाण्याची पातळी कमी होणं, ब्लड शुगर लेव्हल कमी
(Low Blood Sugar Levels) होणं या गोष्टींचा थेट संबंध आहे. त्यावरून कळतं त्यांची प्रकृती कशी आहे. वैद्यकीय तपासणी न झाल्याने त्यांच्या प्रकृतीविषयी सांगू शकत नाही. परंतु ब्लड शुगर, ब्लड प्रेशर खालच्या पातळीवर आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. कालपर्यंत त्यांचं ब्लड प्रेशर 110 च्या लेव्हलवर आणि ब्लड शुगर 100 च्या खाली होता. ते खात नसल्याने ते खाली जात आहे, असंही डॉक्टर पुढे म्हणाले.

आज सर्वपक्षीय बैठक

मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाची व्याप्ती वाढत असल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
(CM Eknath Shinde) यांनी आज (सोमवारी) सर्वपक्षीय नेत्यांची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह इथे साडेसात वाजता
बैठक बोलावली आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत सरकार करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती सर्वपक्षीय नेत्यांना
दिली जाणार असून, त्यांच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
या बैठकीला विरोधी पक्षांचे नेते आणि जरांगे कसा प्रतिसाद देतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | कार्बनीकरण कमी करण्याचा उद्योजक,तंत्रज्ञ,अभियंत्यांचा निर्धार

Bharati Vidyapeeth New Law College | भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजच्या वतीने ‘ग्राहक संरक्षण कायदे’ विषयावर कार्यशाळा