‘मी पण सचिन’ प्रदर्शनासाठी  सज्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

सचिन….हे नाव घेतलं की, सर्वात आधी डोळ्यासमोर एकच चेहरा येतो. तो चेहरा म्हणजे क्रिकेटमधील  मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा. क्रिकेटवेड्या  आपल्या देशात सचिन म्हणजे अनेकांचा आदर्श. त्याचा आदर्श घेऊन कित्येक तरुण खेळडू याच खेळात करिअर करण्याची स्वप्न पाहतात . अशा सर्व होतकरु आणि नव्या जोमाच्या महत्त्वाकांक्षी खेळाडूंवर भाष्य करणारा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे .

[amazon_link asins=’B07G5B3JT2,B00RGI7BP6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d963e28a-a764-11e8-a6dd-677ffd8fef85′]

सचिन तेंडुलकरच्या  कार्यकर्तृत्वाला मराठी व हिंदी चित्रपटातून  प्रेक्षकांसमोर आणले जात आहे.  आता असाच एक मनोरंजन कथेच्या स्वरुपातील ‘मी पण सचिन ‘ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज होत आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन श्रेयस जाधव यांचे असून या चित्रपटाची निर्मिती गणेश गीते व मीता जाधव यांची आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशी मध्यवर्ती भूमिकेत आहे.