दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठा गर्दीने फुलल्या, कोरोनाच्या काळात नियमांचे उल्लंघन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दिवाळी अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठा विविध साहित्यांनी सजल्या आहेत. त्यात दिवाळीच्या खरेदीसाठीचा (diwali-shopping) शेवटचा रविवार असल्याने काेराेनाची भीती न बाळगता मुंबईकरांनी (mumbaikars-fell-out-house-without-fear-Caroana) विविध वस्तू ,कपडे खरेदी, सजावटीचे साहित्य, विविध आकाशकंदील, लाईटींगच्या माळा, पणत्या, रांगोळी खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये (markets-flourished) गर्दी केली हाेती. सायंकाळी तर बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या होत्या. पण यामुळे अनेक ठिकणी फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. तर अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाल्याचे चित्र पाहवयास मिळाले.

गेले काही महिने काेरोना संसर्गामुळे बंदिस्त जीवन जगणाऱ्या मुंबईकरांनी पुनश्च हरिओमनंतर तसेच दिवाळीच्या पाशर्वभूमीवर उत्साहात रविवारी खरेदीला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. कपडे ,दागिने, सजावटीसाठी वस्तू खरेदीसाठी अनेकजण दादर परिसरात येत आहेत. मास्क लावणारे मुंबईकर सुरक्षित अंतर मात्र पाळत नसल्याचे चित्र हाेते. सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने अनेकांनी खासगी वाहनांचा वापर केला. खरेदीसाठी अनेकजण दादरला प्राधान्य देतात. रविवारी दादर टीटी, टिळक ब्रीज,पानेरी जंक्शन,प्लाझा यासोबतच सायन, कुर्ला तसेच सीएसएमटी परिसरात वाहतूककोंडी झाली होती, असे एका वाहतूक पोलिसाने सांगितले. तर गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होऊ नये, याची दक्षता बाजारपेठेत व्यापारी घेतांना दिसून येत होते.

दिवाळीसाठी खरेदी आवश्यक आहे. सार्वजनिक वाहने उपलब्ध नाहीत. त्यामुळे आम्हाला इतर वाहनांनी यावे लागत आहे. दिवाळी खरेदीची गर्दी काेरोना संसर्गास आमंत्रण देणारी असली तरी आम्ही सुरक्षेसाठी मास्कचा वापर करत असल्याचे संगीता सोनवणे या ग्राहकाने सांगितले.