Maruti Alto वर मिळत आहे 25 हजार रुपयांपर्यंतचा  डिस्काउंट! जाणून घ्या पूर्ण डिटेल

नवी दिल्ली : Maruti Alto | कार उत्पादक कंपनी मारूतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त विक्री वाढवण्यासाठी ही ऑफर आणली आहे. वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकी अल्टो कार वर डिस्काउंट ऑफर (Discount offer on Maruti Alto car) करत आहे. या कारची सुरूवातीची किंमत 2.99 लाख रुपये आहे, ज्यासोबत कंपनी 25 हजार रुपयांपर्यंतच्या बचतीची ऑफर सुद्धा देत आहे. या ऑफर अंतर्गत अल्टोची पेट्रोल व्हेरिएंट खरेदी केल्यास ग्राहकांना एकुण 25 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट (Discount up to Rs 25,000) ऑफर केला जात आहे.

कंपनी ऑगस्ट महिन्यासाठी ही डिस्काऊंट ऑफर घेऊन आली आहे. कारच्या पेट्रोल व्हर्जन बाबत बोलायचे तर STD ट्रिमवर 15,000 रुपये आणि इतर सर्व ट्रिम्सवर 25,000 रुपये रोख सूट मिळेल. कंपनी आपल्या सीएनजी व्हेरिएंटवर केवळ 5 हजार रुपयांचाच डिस्काउंट ऑफर करत आहे.

मारुती अल्टोमध्ये आपो 796 सीसीचे इंजिन मिळेल जे 40.36 बीएचपीची पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. तिचे इंजिन 0.8 लीटर क्षमतेचे आहे. तिच्यात पावर विंडोज फ्रंट, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, ड्रायव्हर एयरबॅग आणि पावर स्टिअरिंग मिळेल.

ही कार मॅन्युअल ट्रान्समिशनसोबत येते. कंपनीचा दावा आहे की, कार प्रति लीटर पेट्रोलमध्ये 22.05
किलोमीटरचा मायलेज देते. परंतु ही कार सीएनजीवर 31.59 किलोमीटरचा मायलेज देते. कंपनी या
कारच्या मिड व्हेरिएंटमध्ये सीएनजी किटचा पर्याय देते. या कारमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक
दोन्ही गियरबॉक्सचा पर्याय आहे.

हे देखील वाचा

LIC Jeevan Akshay | LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून आयुष्यभर मिळतात पैसे, जाणून घ्या अटी

New LPG Connection | आता एका मिस्ड कॉलद्वारे मिळेल नवीन LPG कनेक्शन, जाणून घ्या पूर्ण डिटेल्स

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Maruti Alto | discount of up to rs 25000 is available on maruti alto know full details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update