New LPG Connection | आता एका मिस्ड कॉलद्वारे मिळेल नवीन LPG कनेक्शन, जाणून घ्या पूर्ण डिटेल्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एलपीजी कनेक्शनसाठी (New LPG Connection) सरकारी ऑईल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOC) ने एक नवीन सर्व्हिस सुरू केली आहे. या नवीन सर्व्हिस अंतर्गत ग्राहकांना मिस्ड कॉलद्वारे नवीन गॅस कनेक्शन (New LPG Gas Connection Via Missed Call) मिळेल. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे या नवीन सर्व्हिसची माहिती दिली.

कंपनीने ट्विट करून म्हटले आहे की, नवीन इण्डेन एलपीजी कनेक्शन केवळ एका मिस्ड कॉलवर (New gas connection via missed call) जारी होईल. यासाठी ग्राहकांना 8454955555 वर मिस्ड कॉल करावा लागेल. ग्राहकांना या सर्व्हिसद्वारे आपल्या दरवाजावर एलपीजी कनेक्शन प्राप्त होईल.

म्हणजे मिस्ड कॉलनंतर स्वता कंपनी ग्राहकांशी संपर्क करेल. संपर्क केल्यानंतर ग्राहकाकडून आधार कार्डची माहिती आणि इतर डॉक्युमेंटची माहिती मागितली जाईल. ग्राहकांला नवीन कनेक्शनसाठी अ‍ॅड्रेस प्रूफ देण्याची सुद्धा आवश्यकता नाही.

कंपनीच्या नवीन नियमांतर्गत नवीन कनेक्शन घेणार्‍या ग्राहकाच्या कुटुंबातील आई-वडिल,
भाऊ-बहिण किंवा एखाद्या दूरच्या नातेवाईकाच्या नावावर एखादे एलपीजी गॅस कनेक्शन
असेल तर ग्राहक त्या अ‍ॅड्रेसचा लाभ घेऊ शकतो.
म्हणजे आई-वडिल, भाऊ-बहिण यांच्या अ‍ॅड्रेस प्रूफवर सुद्धा तुम्हाला कनेक्शन दिले जाते.

मात्र, यासाठी ग्राहकाला त्या गॅस एजन्सीच्या कार्यालयात जावे लागेल जेथून कुटुंबाला गॅस सिलेंडर येतो.
यानंतर ग्राहकाला पहिल्या गॅस कनेक्शनशी संबंधीत कागदपत्र द्यावी लागतील जी व्हेरिफाय करून ग्राहकाला नवीन कनेक्शन दिले जाईल.

Web Title :- New LPG Connection | now new lpg connection will be available through a missed call know full details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Neeraj Chopra Diet | सालमन फिश-चिकन आणि ब्रेड ऑमलेट, ‘या’ गोष्टींमध्ये दडलंय नीरज चोपडाच्या ताकदीचं ‘गुपित’

Pune Accident News | दुर्देवी ! दोन दुचाकीचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

DGP Sanjay Pandey | 190 सहाय्यक निरीक्षकांना (API) पोलिस निरीक्षकपदी (PI) बढती लवकरच, DGP संजय पांडे यांची Facebook Live मध्ये माहिती (व्हिडिओ)