कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ! मास्क खरेदी करताना आणि घालताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, दाढी ठेवणाऱ्यांनी खबरदारी घेणे आवश्यक

पोलीसनामा ऑनलाइन – Mask Wearing Tips: कोरोना साथीच्या रोगाला टाळण्यासाठी सरकारपासून डॉक्टरांपर्यंत लोकांना मास्क घालून घराबाहेर पडण्याचे आवाहन करीत आहेत. तथापि, कोरोना विषाणू आणि मास्कचे संशोधन यात नवीन खुलासे केले जात आहेत. अलीकडे, सीडीसी ने देखील हा विषाणू टाळण्यासाठी मास्क परिधान आणि खरेदी करताना काही खबरदारी आणि सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. सीडीसी ने त्या लोकांना खास सूचना दिल्या आहेत जे लोक दाढी ठेवतात.

 

 

 

 

कसे कराल मास्कची निवड-
१- मास्क खरेदी करताना नेहमी लक्षात ठेवा की मास्क दोन किंवा अधिक स्तरांचा आहे. ज्यामध्ये तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होणार नाही.
२- मास्क खरेदी करताना आपले तोंड आणि नाक दोन्ही झाकले जातील याची खात्री करून घ्या. चेहरा नाक आणि हनुवटी यांच्यामध्ये कोणतेही अंतर असू नये.
३- मास्क घालताना तुमचा मास्क सैल होत नाही हे पहा.
४- मास्कच्या वरून हवा येण्यापासून थांबवण्यासाठी याची खात्री करा की तुमच्या मास्कच्या वरील बाजूस तार आहे की नाही.
५- लहान मुलांसाठी मास्कची निवडताना लक्षात ठेवा की मास्क त्यांच्या चेहऱ्यावर फिट्ट बसला पाहिजे.

चुकूनही मास्क खरेदी करताना या चुका करू नका
१-चुकूनही अशा मास्कचा वापर करू नका, जे घातल्यावर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होईल.
२- अशा मास्कचा वापर करू नका, ज्यामध्ये श्वास सोडण्यासाठी वाल्व अथवा वेन्ट लावले असतील. असे मास्क व्हायरसपासून सुरक्षा देण्यासाठी असमर्थ आहेत.

चेहऱ्यावर दाढी ठेवणाऱ्या व्यक्तींनी या गोष्टी लक्षात ठेवा-
१- चेहऱ्यावर दाढी ठेवणारे लोक मास्क खरेदी करताना मास्क फिटर अथवा ब्रेसचा उपयोग करा.
२- मल्टि लेयर मास्क घालण्याआधी डिस्पोजेबल मास्क घाला. दुसरा मास्क चेहरा आणि दाढीवर परिधान केलेल्या पहिल्या मास्कच्या काठाशी जोडलेला असावा.
३- जे त्यांच्या दाढीला ट्रिम करत नाहीत त्यांच्या चेहऱ्यावर साधे मास्क सैल होऊ शकतात. असे दाढी ठेवणाऱ्या व्यक्तींनी मास्क घालणे आवश्यक आहे.

मास्क घालण्याचा योग्य मार्ग-
चेहऱ्यावर मास्क घालताना मास्कला स्पर्श करू नका. जर तुम्हाला वारंवार तुमच्या मास्कला स्पर्श करावा लागत असेल तर तो चेहऱ्यावर व्यवस्थित बसत नाही. तुम्हाला तुमचा मास्क बदलण्याची आवश्यकता आहे.