कौटुंबिक सहलीसाठी आता मिनी ट्रेन करता येणार बुक 

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाइन – उन्हाळ्याच्या सुट्यांच्या व्यतिरिक्त पर्यटकांना थंडीच्या काळातही  फिरायला जायला आवडते. मुंबईतील पर्यटक माथेरान, नेरळ, महाबळेश्‍वर यांसारख्या थंड हवेच्या ठिकाणाला जास्त पसंत  करतात. खासकरुन सुट्टीच्या दिवशी किंवा विकेण्डच्या काळात माथेरानला अनेक कुटुंबे प्राधान्य देत असतात. अशाच निसर्ग सौंदर्य लाभलेल्या माथेरानमध्ये मिनी ट्रेनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ज्यामुळे कौटुंबिक सहलीला जाणाऱ्यांचा आनंद द्विगुणत होणार आहे.
ट्रेन या साईट वरून बुक करता येणार 

विशेष म्हणजे एखाद्या कुटुंबाला कौटुंबिक सहलीसाठी ही मिनी ट्रेन बुक करता येणार आहे. माथेरानला येणाऱ्या पर्यटकांसाठी रेल्वेने विविध सोई उपलब्ध करून दिल्या आहे. यामध्ये प्रवाशांचे आकर्षण असलेल्या मिनी ट्रेनला आता एक वातानुकूलीत डब्यासोबतच विस्टाडोमचा डबा देखील जोडण्यात आला आहे. मात्र, आता याच मिनी ट्रेनला कौटुंबिक सहलीसाठी, बर्थ डे किंवा पार्टीसाठी आयआरसीटीसी (irctc) च्या वेबसाइटवरून बुक करता येणार आहे.

एवढे असणार भाडे 

सुट्टीच्या दिवशी कौटुंबिक सहलीसाठी मिनी ट्रेनचा चार्टर्ड ट्रेन बुक करण्यासाठी ९५ हजार रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. सकाळी नेरळ स्थानकातून ही ट्रेन सुटणार असून परतीचा प्रवास देखील याच ट्रेनमधून करता येणार आहे.